नवी दिल्ली – जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला फिफा विश्वचषक (2022) पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. दक्षिण अमेरिकेच्या फुटबॉल महासंघाने मेस्सी विरुद्ध ही कारवाई केली असून त्याला 1 हजार 500 डॉलरचा दंडही झाला आहे.
कोपा अमेरिका स्पर्धेतील तिसऱ्या स्थानासाठी चिली विरुद्धच्या सामन्यात मेस्सीला “रेड कार्ड’ मिळाले होते. या सामन्यातील खेळाच्या 37 व्या मिनिटाला मेस्सी चिलीच्या गॅरी मेडलशी भिडला होता. यावेळी रेफ्रींनी दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवला. मेस्सीविरोधातील निलंबनाच्या कारावाईमध्ये त्याने कोपा अमेरिका महासंघावर केलेल्या गंभीर आरोपाचा कोणताही उल्लेख केलेला नाही.