#ICCWorldCup2019 : विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ दिसणार भगव्या जर्सीमध्ये? 

नवी दिल्ली – विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना भारतीय क्रिकेट संघ काही सामन्यांमध्ये परंपरागत निळ्या जर्सीऐवजी भगव्या जर्सीत दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर अवघा देश भगवामय झाला आहे. याचाच परिणाम भारतीय संघावरही होताना दिसत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु, असे काही नसून फुटबॉल नियमांच्या पार्श्वभूमीवर आयसीसीही होम आणि अवे सामान्यांसाठी दोन रंगाच्या जर्सीचा नियम बनवीत आहे. मात्र याची अदयाप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

भारतासोबत इंग्लंड, श्रीलंका, आणि अफगाणिस्तान यांच्याही जर्सीचा रंग निळा आहे. तर दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या जर्सीचा रंग हिरवा आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, इंग्लंड, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध सामन्यात भारतीय संघ भगवा जर्सीत दिसण्याची शक्यता आहे. सामन्यांमध्ये या संघांची जर्सी एकसारखी दिसू नये, असे यामागील कारण आहे.

दरम्यान, भारतीय संघाची भगवा जर्सी करण्यामागे मोदी सरकार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. परंतु, यामध्ये कोणतेही तथ्य नसून अद्याप अधिकृत निर्णय होणे बाकी आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)