slam Mitchell Marsh : 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने (India vs Australia) भारताचा 6 गडी राखून पराभव करून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवामुळे लाखो चाहत्याचं मन मोडलं. 2023 विश्वचषक जिंकल्यानंतर (World Cup 2023 Final) आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल होत आहेत.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अष्टपैलू मिचेल मार्शचा (slam Mitchell Marsh) असाच एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो वर्ल्ड कप ट्रॉफीवर (World Cup Trophy) पाय ठेवताना दिसत आहे. त्याचा हा अंदाज पाहून हजारो जण या ऑस्ट्रेलियन खेळाडूवर भडकले असून त्याच्यावर टीकास्त्र सोडण्यात येत आहे.
मात्र, काही लोक या ट्रॉफीवर पाऊल ठेवण्यामागे मिशेलच्या (slam Mitchell Marsh) आत्मविश्वासाला दुजोरा देत आहेत तर काही जण याला ट्रॉफीचा अपमान म्हणत आहेत. लोक याला मिशेल मार्शची वाईट वृत्ती म्हणत असून त्याला ट्रोल करत आहेत. सध्या त्याचा हा फोटो सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.
Mitchell Marsh with the World Cup. pic.twitter.com/n2oViCDgna
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 20, 2023
मायक्रोब्लॉगिंग साइट X (पूर्वीचे ट्विटर) वर हा फोटो @mufaddal_vohra याच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टला 5 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 11 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
आयसीसी वर्ल्ड कप 2023 फायनल भारत हारल्यामुळे संपूर्ण देशात निराशेचं वातावरण आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये रंगलेल्या वर्ल्ड कप 2023 फायनल सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. सांगायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपवर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं आहे.