World Cup 2023 Final : ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून वनडे विश्वचषक 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला 240 धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रत्युत्तरात एकवेळ ऑस्ट्रेलियानं 47 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. मात्र, यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी शानदार भागीदारी करत सामना भारताच्या हातातून काढून घेतला.
टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन करण्यासाठी विकेट्सची गरज होती. जसप्रीत बुमराह 28 व्या षटकात गोलंदाजी करायला आला. या षटकातील पाचवा चेंडू थेट लॅबुशेनच्या पॅडवर गेला. बुमराह आणि यष्टिरक्षक केएल राहुलसह सर्व क्षेत्ररक्षकांनी अपील केले, परंतु पंच रीचर्ड कॅटलबरो यांनी ते नाकारले.
लॅबुशेन बाद झाल्याचा राहुलला विश्वास होता. या दोघांनी कर्णधार रोहितला डिसिजन रिव्ह्यू सिस्टम (डीआरएस) वापरण्यास सांगितले आणि रोहितने उशीर केला नाही. त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या 1.30 लाख चाहत्यांच्या आणि करोडो भारतीयांच्या आशा त्या डीआरएसवर टिकून होत्या. टीम इंडियाला ती विकेट मिळाली असती तर भारताला सामन्यात पुनरागमन करता आलं असतं, पण तसं झालं नाही. या सामन्यात Umpire Call मुळे लॅबुशेन याला DRS अपीलनंतर Not Out घोषित करण्यात आले.
अंपायर रीचर्ड कॅटलबरो पुन्हा एकदा टीम इंडियासाठी Unlucky ठरले. हा निर्णय पंचाचाच (Umpire Call) होता असे रिव्ह्यूवरून दिसून आले. म्हणजेच अंपायरने त्याला नॉट आऊट दिले असते तर तो नॉट आऊट होता, जर अंपायरने त्याला आऊट दिला असता तर तो आऊट होता. ‘अंपायर्स कॉल’चा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे.
रिव्ह्यूमध्ये असे दिसून आले की चेंडू विकेटला आदळत होता, पण तो अंपायरचा कॉल होता. अंपायरच्या कॉलचा अर्थ असा होतो की चेंडू इकडे तिकडे जाऊ शकला असता, म्हणजेच मार्जिन ऑफ एररचा फायदा अंपायरला दिला जातो. आणि या सामन्यात Umpire Call मुळे लॅबुशेन याला DRS अपीलनंतर Not Out घोषित करण्यात आले. अशाप्रकारे अंपायर रीचर्ड कॅटलबरो पुन्हा एकदा भारतासाठी (Unlucky) अनलकी ठरले. यापूर्वी, 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल आणि 2014 T20 वर्ल्ड कपच्या फायनलसह अनेक फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवादरम्यान त्यांनी अंपायरिंग केले आहे.
अंपायर कॅटलबरो पुन्हा एकदा टीम इंडियासाठी Unlucky…
2014 T20WC Final (Onfield Umpire)
2015 WC Semi Final (Onfield Umpire)
2016 T20WC Semi Final (Onfield Umpire)
2017 CT Final (Onfield Umpire)
2019 WC Semi Final (Onfield Umpire)
2021 WTC Final (TV Umpire)
2023 WTC Final (TV Umpire)
‘अंपायर्स कॉल’चा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि त्यावर टीकाही होत असते. माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण, गौतम गंभीर आणि हरभजन सिंग आणि पाकिस्तानचे वसीम अक्रम, शोएब मलिक, मिसबाह-उल-हक यांच्यासह अनेक दिग्गजांनी अंपायर कॉलवर टीका केली आहे. ते म्हणतात की, चेंडू विकेटला कोणत्याही प्रकारे आदळला तर तो आऊट द्यायला हवा किंवा द्यायचे नसेल तर पूर्णपणे नॉट आउट द्यावे. काही प्रसंगी अंपायरने त्याला आऊट केल्यावर तो आऊट असतो आणि काही महत्त्वाच्या वेळी त्याला नॉट आऊट दिल्यास फलंदाज नॉट आऊट असतो, असे घडू नये.