नवी दिल्ली – भारताने जागतिक रस्ते पायाभूत सुविधा परिषद आयोजित केली आहे. ही परिषद सहा ते सात मार्च दरम्यान नवी दिल्लीत होणार आहे. या परिषदेला या क्षेत्रातील जागतिक पातळीवरील 300 तज्ञ उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेमध्ये सुरक्षित रस्त्याची निर्मिती, शहरातील रस्ते निर्मिती, कार्यक्षम वाहतूक व्यवस्था इत्यादी विषयावर चर्चा केली जाणार आहे. रस्ते निर्मिती जास्तीत जास्त पर्यावरण पूरक असावी यासाठी काय उपाययोजना करता येतील या संदर्भात यावेळी विचारविनिमय केला जाणार आहे.
रस्त्याची निर्ती आणि डिझाईन निर्दोष पद्धतीने केली जावी. त्यामुळे रस्त्यावरील अपघाताचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी होईल, हा या मागचा उद्देश आहे. भारतातील रस्त्याचा दर्जा जागती पातळीची झाला आहे. मात्र तरीही वाहतूक व्यवस्थेतील दोषामुळे भारतीय रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी झालेले नाही.
ते कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचा भाग म्हणून ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्या, महामार्ग निर्मिती क्षेत्रातील कंपन्या, कंत्राटदार, कन्सल्टंट, स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.