World Chess Championship 2024 : – भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश याने जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या 10 व्या गेममध्ये गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनविरुद्ध बरोबरी साधली. शनिवारी गुकेशने आपल्या चिनी प्रतिस्पर्ध्याचा धैर्याने सामना करत सामना अनिर्णित राखला.
गुकेश या फेरीत काळ्या मोहऱ्यांसोबत खेळायला आला आणि त्याने आपली ताकद दाखवून दिली. लिरेननेही या काळात कोणताही धोका पत्करला नाही आणि ड्रॉसाठी सहमती दर्शवली. दोन्ही खेळाडूंनी 36 चालीनंतर गुणांची विभागणी करण्याचे मान्य केले.
World Chess Championship 2024 : डी गुकेश-डिंग लिरेन यांच्यातील आठवी फेरीही बरोबरीतच…
गुकेश आणि लिरेन यांच्यातील शेवटचे सात सामने अनिर्णित राहिले, तर दोघांनी एकूण आठ सामने अनिर्णित ठेवले आहेत. दोन्ही खेळाडूंचे पाच गुण समान आहेत. या चॅम्पियनशिपमध्ये फक्त चार फेऱ्या शिल्लक आहेत आणि जो खेळाडू प्रथम 7.5 गुण मिळवेल तो विजेता होईल. १४ फेऱ्यांनंतरही सामना बरोबरीत राहिल्यास, विजेता निश्चित करण्यासाठी सामना वेळेच्या नियंत्रणानुसार खेळला जाईल.