आईचं दुध अमृतासमानच (भाग २)

डॉ. वैशाली माने 
1 ते 8 ऑगस्ट हा आठवडा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने बाळाच्या आणि आईच्या आरोग्याच्या दृष्टीने स्तनपानाचे फायदे सांगितले जातात. आपल्या भारतीय संस्कृतीत तर तान्हुल्या बाळासाठी आईचे दूध म्हणजे साक्षात अमृतासमान मानले आहे. आईच्या दुधाला पर्याय नाही. अगदी पर्यायच काढावयाचा झाल्यास आईसमान असणाऱ्या दाईचे दूध हे उत्तम आणि हेही दूध उपलब्ध नसेल तर बकरीचे किंवा देशी गायीचे दूध तेही संस्कारीत करून! 
दुधाची परीक्षा कशी करावी? 
आईच्या दुधाचे 5-6 थेंब किंवा धार पाण्यात टाकावेत ते पाण्यात टाकल्याबरोबर पाण्याबरोबर एकरूप व्हावे. पाण्याच्या तळाशी जाऊन बसू नये किंवा पाण्यावर तरंगू नये. पाण्यावर फेस किंवा बुडबुडे येऊ नये हे दूध धागेदार असू नये. दूध स्वच्छ, पातळ आणि शीतल असावे. दुधाचा रंग शंखाप्रमाणे पांढरा असावा आणि चव गोड असावी.
आईच्या दुधाचे आजार 
काही कारणाने आईच्या दुधामध्ये दोष निर्माण होतात यालाच स्तन्यविकृती असे म्हणतात. या साधारणतः तीन प्रकारच्या आहेत.
दूध कमी प्रमाणात येणे किंवा क्षीणस्तन्य/स्तन्यक्षय
स्तन्यनाश
दूध अति प्रमाणात येणे किंवा स्तन्यवृद्धी
दूध वात-पित्त-कद या दोषांनी दूषित होणे किंवा स्तन्यदुष्टी
दूध वाढविण्याचे उपाय – 
श्रम, व्यायाम अजिबात करू नये. कशाचीही काळजी करू नये. आईने आनंदी, प्रसन्न राहावे, पुरेशी विश्रांती घ्यावी. आहारात तुपाचा वापर भरपूर करावा. शतावरी कल्प, अश्‍वगंधा, मुसळी, हळीव, खसखस, चारोळी, गोडांबी यांच्या खिली भरपूर दूध घालून त्यात साखर, वेलची, केशर, काजू, नदाम, पिस्ता घालून त्या खाव्यात. जर आई मांसाहार करीत असेल तर मटण, चिकन, तसेच मासे, खेकडे यांचे सूप प्यावे. आहारात ओला नारळ, दुधी भोपळा, भुईकोहळा, पालेभाज्या, फळभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये, गव्हाचे पदार्थ भरपूर घ्यावीत. डिंकाचे लाडू, हळीवाचे लाडू खावेत. बडीशेप, मेथी हे दूध वाढविण्यासाठी विशेष उपयोगी आहेत.
दूध अतिप्रमाणात येणे/स्तन्यवृद्धी
बाळाला दूध पाजून झाल्यानंतर देखील जर आईच्या स्तनांमध्ये दूध शिल्लक राहात असेल किंवा छाती मोकळी होत नसेल तेव्हा त्यास स्तन्यवृद्धी किंवा दूध अतिप्रमाणात येणे असे म्हणतात. दूध येण्यासाठी म्हणून जो आहार सांगितलेला आहे त्याचा अतिरेक झाल्याने तसेच तयार होणारे दूध काही कारणाने बाळाकडून पुरेसे पिले गेले नाही तर दूध भरपूर होऊन स्तनांमध्ये साठू लागते. त्यामुळे स्तनांचा आकार वाढतो. स्तनांच्या ठिकाणी दुखू लागते. जडपणा, कठीणपणा जाणवू लागतो. स्पर्शदेखील सहन होत नाही इतपत दुखते. बारीक ताप, कणकणी जाणवू लागते. या अति दुधामुळे बाळास अजीर्ण होऊन उलटी, पोटदुखी, ताप, काणकणी, खराब वास असणारी जुलाब असे त्रास जाणवू लागतात.
उपाय 
अति प्रमाणात दूध येत असल्यास स्तनांमध्ये साठलेले दूध काढून टाकावे. स्तनांवर हळदीचा लेप लावावा. तांदूळ भिजवून वाटून आणि दुर्वा बारीक वाटून एकत्र करून त्याचा लेप स्तनावर लावावा. स्तन मोकळे न ठेवता योग्य आकाराची ब्रा वापरावी. छाती चोळू नये किंवा शेकू नये. अन्यथा त्यामध्ये पू निर्माण होण्याची शक्‍यता असते. आहारातून पातळ, गोड पदार्थ जेवढे कमी करता येतील तेवढे कमी करावे. आहाराचे प्रमाण कमी करून आहार रुक्ष व हलका घ्यावा. विशेषतः ज्या बाळंतीण स्त्रीचे अपत्य जन्मानंतर मरण पावलेले आहे अशा बाळंतीणीस दूध बंद होण्यासाठी औषधे द्यावी लागतात.
नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण 
स्तनपान हा विषय आपल्या सगळ्यांना परिचयाचा असला तरी यातील बारकावे माहीत नसल्यास आपल्या देशात आजही नवजात अर्भकांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रात दरवर्षी 25-30 लाख बालकं जन्माला येतात, त्यामध्ये प्रत्येक 1000 बाळांपैकी 1 वर्षाच्या आत 38 बालकं मृत्युमुखी पडतात. त्याचे कारण असे लक्षात आले की कुपोषण हे 55% बालकांच्या मृत्यूस जबाबदार आहे. त्यामुळे स्तनपान हे बाळाला अमृतासारखे व पूर्णान्नासारखे असते.
जागतिक स्तरावर दरवर्षी केवळ 38% अर्भकांना यशस्वी स्तनपान दिले जाते. WHO व UNICEF आहे. त्यांनी दिलेल्या अहवालात (2012) हे प्रमाण 2025 पर्यंत निदान 50% पर्यंत जावे असे म्हटले आहे.
भारतात परिस्थिती काही वेगळी नाही. The Infant and young child feeding (IUCF) ही INDIAN ACAOCEMY OF FEDIATRICS (IAP) ची एक शाखा आहे. IYCF, WHO UNICEF, IYCF, WHO UNICEF व इतर अनेक सरकारी खात्यांनी एकत्रितपणे 2015 साली नवी दिल्ली येथे झालेल्या कॉन्फरन्समध्ये भारतासाठी काही लक्ष्ये व मार्गदर्शक तत्त्वे मांडली आहेत.
आपला भारत देश आज जागतिक पातळीवर प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. आज जन्मलेले बाळ आपल्या देशाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे व मौल्यवान कामगिरी बजावू शकतो व त्या प्रत्येक नवजात बाळाला सुदृढ व निरोगी ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची व बाळाच्या आईची आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)