जागतिक बॅंकेकडून पाकिस्तानला 500 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर

इस्लामाबाद:  जागतिक बॅंकेने पाकिस्तानला 4 वर्षांनंतर 500 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे. करोना विषाणूच्या साथीच्या पार्श्‍वभुमीवर हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. जागतिक बॅंकेच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये या कर्जाला मंजूरी देण्यात आली.

पाकिस्तानात महिलांपर्यंत आरोग्यसेवा व शिक्षण पोहोचण्यासाठी 500 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या कार्यक्रमास मान्यता देण्यात आली. राजकीय अस्थैर्याच्या पार्श्‍वभूमीवरच करोनाचे संकट उद्‌भवले आहे. करोनाच्या संकटामुळेच राजकीय संकट अधिक तीव्र होत चालले आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी ही मदत दिली गेली आहे, असे जागतिक बॅंकेच्या निवेदनात म्हटले आहे.

तथापि, पाकिस्तानच्या डेबिट पॉलिसी कोऑर्डिनेशन ऑफिसच्या पुनर्रचनेसंदर्भातील अटींबाबत एकमत नसल्याने आणखी 500 दशलक्ष डॉलर्स कर्जाच्या मंजुरीस उशीर करण्यात आला. मंजूर करण्यात आलेले 500 दशलक्ष डॉलरचे कर्ज पाकिस्तानला 30 वर्षात फेडायचे आहे. 2017 मध्ये स्थूल आर्थिक निर्देशक घसरल्यामुळे जागतिक बॅंकेने पाकिस्तानची बजेट आधारित कर्जे स्थगित केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.