बीजिंग – चीनमधून जगभरात पसरलेल्या करोनाच्या विषाणूंचा धोका अद्याप संपलेला नसल्याने चीन ऑलिम्पिक संघटना तसेच बॅडमिंटन संघटना यांनी हा धोका संपुष्टात येईपर्यंत कोणत्याही स्पर्धा होणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रतिथयश जागतिक बॅडमिंटन स्पर्धाही संकटात सापडली आहे.
2022 साली चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा वगळता देशात पुढील 2 वर्षे कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले जाणार नसल्याचे चीन क्रीडा महासंघाने जाहीर केले आहे. या निर्णयामुळे येत्या डिसेंबरमध्ये होणारी जागतिक बॅडमिंटन स्पर्धाही संकटात सापडली आहे. जागतिक स्पर्धेबाबत चीनची भूमिका काय आहे त्यानुसार वेळापत्रक आखण्यात येणार आहे.