पुणे : मार्केट यार्ड भागात करोना रुग्णाची संख्या वाढली आहे. आवश्यक प्रमाणात टेस्ट झालेल्या नाहीत. कामगारही त्या भागातुन कामाला येतात. करोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या कामगार संघटनाच्या बैठकीत कामगारांनी बुधवारपासून कामावर न येण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीस हमाल पंचायतचे सरचिटणीस नवनाथ बिनवडे, कामगार युनियनचे सरचिटणीस संतोष नांगरे, गोरख मेंगडे, चंद्रकांत मानकर, हुसेन पठाण, किशोर भानुसघरे,अंकुश आवताडे आदी उपस्थित होते..
मार्केटयार्ड येथील प्रेमनगर 5,आंबेडकरनगर येथे 8 कोरोना रुग्ण आढळलेत. यापैकी दोघांचा मृत्यूही झाला आहे. यापैकी एक टेम्पो संघटनेच्या सभासदाचे वडील होते. अनेक लोकांची टेस्ट झाली नाही. खबरदारी न घेतल्यास दाट लोकवस्ती असल्यामुळे येथील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
मार्केट यार्डात भुसार बाजार सुरू आहे. तेथे काम करणारे बरेच कामगार याच झोपडपट्टीतील आहेत. त्यामुळे भुसार बाजार बंद करावा, या मागणीचे पत्र बाजार समितीला देण्यात आले आहे. तसेच, आमच्या कामगारांच्या जीवाची हमी देखील संबंधित यंत्रणा घेत नाही. त्यामुळे सर्व संघटनांच्या बैठकीत बुधवारपासून भुसार बाजारात कोणताही कामगार कामावर जाणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली.