अहमदाबाद : गुजरातमधील सूरतहून उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या बसेस गुजरात सीमेवर थांबविण्यात आल्याने मजूरानी गुजरात पोलिसांवर दगडफेक केली आहे. शनिवारी प्रशासकीय कारणास्तव वडोदराच्या वाघोडियाजवळील हललोल चेकपोस्ट नाक्यावर बस हि घटना घडली. थांबविण्यात आल्याने मंजूर संतप्त झाले होते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
त्यामुळे मजूरानी पोलिसांवर दगडफेक केली, तर परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अज्ञातांविरुद्ध आयपीसी कलम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार दंगा करणे आणि प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अद्याप कोणालाही अटक नाही
अधिकाऱ्यांनी सांगितले कि, उत्तर प्रदेशातून येणाऱ्या शेकडो कामगारांना मध्यप्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर अडवण्यात आले होते. त्यांना पुढील राज्यात जाण्याची परवानगी मिळाली नसल्याने सीमेवरच थांबवण्यात आलं होत.
दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे एक हजार नागरिक रस्तावर उतरले होते. हे सर्व कामगार उत्तर भारतातील होते. त्यांनी घरी जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी चंद्रपूर प्रसाशनाकडे केली आहे. ही घटना जिल्ह्यातील बल्लारपूर येथे शनिवारी सकाळी 9.30 वाजता घडली. पोलिसांना मिळताच रामनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.