नवी दिल्ली – एल अँड टीचे अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम यांनी ९० तासांच्या कामाच्या आठवड्यावर केलेल्या विधानानंतर देशात या मुद्द्यावरील चर्चा अद्याप संपलेली नाही. चित्रपट आणि व्यावसायिक जगतापासून ते राजकीय व्यक्तींपर्यंत सर्वांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही या वादावर भाष्य केले आहे.
दिल्लीतील कोटला रोड ९ए येथे असलेल्या नवीन काँग्रेस मुख्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनानिमित्त बोलताना खर्गे यांनीही आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, पंडित नेहरू आणि डॉ. आंबेडकर यांनीही दिवसाला ८ तास कामाचा पुरस्कार केला होता. कामगारांना दिवसातून आठ तासांपेक्षा जास्त काम करायला लावू नये. आता १२ तास आणि १४ तासांची चर्चा आहे. ज्यांना असे वाटते त्यांनी ही कल्पना सोडून द्यावी. मी याच्याशी असहमत आहे.