पिंपरी : अंगावर झाड पडल्याने कामगाराचा मृत्यू

पिंपरी – कामासाठी कंपनीत आलेल्या कामगारांच्या अंगावर झाड पडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना देहूरोड येथील दारूगोळा कारखान्यात रविवारी (दि. ११) सकाळी घडली.

राजेंद्र कुंडलीक गंगावणे (वय ५६ , रा. देहूरोड) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास गंगावणे हे कामासाठी दारूगोळा कारखान्याच्या प्रवेशद्वाराच्या आत आले. ते आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना यांच्या अंगावर सुबाभळीचे झाड पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.