पुणे (प्रतिनिधी) – बांधकाम साईटवरील कामगारांना किरकोळ कारणावरुन मारहाण करण्याची घटना कात्रज येथील बाघजाईनगर येथे घडली होती. हा गुन्हा घडल्यानंतर पळून गेलेल्या आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी शिताफीने शोध घेऊन अटक केली.नारायण ठकारिया चव्हाण(55,), व्यंकटेश नारायण चव्हाण(31), गणेश नारायण चव्हाण(23, सर्व रा. आंबेगा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वाघजाईनगर येथे बांधकाम साईटच्या पहिल्या मजल्यावर कामगार संजय शर्मा व बबलु शर्मा हे काम करीत होते. त्यांच्या शेजारी ठेकेदार नारायण चव्हाण व त्यांचे कामगार काम करत होते. काम करताना संजय शर्माच्या हातून तेथील वायर कट झाल्याने आरोपीच्या मशीनचे शॉर्ट शर्कीट झाले होते. यावरुण त्यांच्यामध्ये वादावादी झाली होती. याचा राग मनात धरुन आरोपींनी साईटवर पडलेल्या लोखंडी सिखंजा, बांबू व रॉडने संजय शर्मा याच्या डोक्यावर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर बबलू शर्मा यास लोखंडी रॉडने हातावर, तोंडावर मारहाण करुन जखमी केले.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा तपास करताना उपनिरीक्षक नितीन शिंदे यांच्या पथकातील अंमलदार सर्फराज देशमुख य विक्रम सावंत यांना आरोपी लिपाणे वस्ती येथे लपले असल्याची खबर मिळाली होती. तेथे सापळा रचून तीघाही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले करत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रविंद्र भोसले, अण्णासाहेब माडीवाले, संतोष भापकर, सोमनाथ सुतार, सचिन पवार, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे यांच्या पथकाने केली.