अण्णापूर ते रामलिंग रस्त्याचे काम सरू

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या आंदोलनाला यश

सविंदणे-अण्णापूर ते रामलिंग हा रस्ता बऱ्याच दिवस अर्धवट अवस्थेत होता. अखेर त्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे.

1 जुलै 2019पासून अण्णापूर ते रामलिंग रस्त्याच्या कामाबाबत व त्या कामाच्या असलेल्या तक्रारीबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी तक्रारी व पाठपुरावा केला. या रस्त्यासाठी व रस्ता पूर्ण होण्यासाठी अनेकांच्या मदतीने पुढाकार घेऊन वाळुंज यांनी या रस्त्याचा पाठपुरावा केला. मध्यंतरी याच कामासाठी दिनांक 1 जानेवारी 2020 पासून बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग शिरूर यांच्याकडून लेखी आश्वासन देण्यात आले होते. सद्यस्थितीत डांबराचा तुटवडा असल्यामुळे 15 जानेवारी 2020 पासून रस्त्याचे काम सुरू होईल. त्यावर विश्वास ठेवून उपोषणाचा निर्णय थांबवण्यात आला; परंतु तरीही काम सुरू झाले नाही.

अधिकाऱ्यांकडून एकप्रकारची दिशाभूल केल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर त्यांनी 17 जानेवारी 2020 पासून बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला. त्याच अनुषंगाने 16 फेब्रुवारीला सार्वजनिक बांधकाम विभाग शिरूर यांच्याकडून अजून एक आश्वासन पत्र देण्यात आले. पुढील तीन-चार दिवसांत काम सुरू करण्यात येईल; परंतु त्यावर विश्वास न ठेवता 17 जानेवारीपासून उपोषणास बसून अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करण्यास भाग पाडले. सध्या रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.