आण्णापूर ते रामलिंग रस्त्याचे काम रखडले

प्रवाश्यांवर उपोषण करण्याची वेळ

सविंदणे : आण्णापूर-रामलिंग रस्त्याचे काम अनेक दिवस झाले तरी प्रलंबित आहे. त्यामुळे प्रवाश्यांना वाहन चालवताना रस्त्यावरील खडीचा खुप त्रास होत आहे. या रस्त्याचे काम अर्धवट राहील्याने खडीवरून घसरुन अनेक अपघात  होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आणि ठेकेदारची मुजोरी याला कारणीभूत आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार, लेखी तक्रार करुनही आधिकाऱ्यांचा आदेश ठेकेदार जुमानत नाही. अर्धवट स्थितीतील रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी २ जानेवारी पासून निलेश वाळुंज या प्रवाश्याने रस्त्याच्या होत असलेल्या दिरंगाईला कंटाळून बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय घेतलेला होता .

त्याची गांभीर्याने सार्वजनिक बांधकाम विभाग शिरूर यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे. १५ जानेवारी पासून रस्त्याचे काम चालू होईल असे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने उपोषणकर्त्यास दिले आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.