नवी दिल्ली- ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील बऱ्याच प्रकल्पांना काम सुरू करू देण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ऑरेंज, ग्रीन झोन मधील अनेक प्रकल्प सुरू होऊ लागले आहे. रांजणगाव एमआयडीसीतील अनेक प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे.
ज्या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे, त्यामध्ये फियाट ऑटोमोबाईल्स या कंपनीचा समावेश आहे. या ठिकाणी जवळ तीन हजार कामगार काम करतात. या सर्व कामगारांना सध्याच्या परिस्थितीत काम कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
त्याचबरोबर जर कुणाला संसर्ग झाला तर उपचाराची व्यवस्था करण्यात आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या प्रकल्पात प्रवासी वाहनाबरोबरच इंजिनांची निर्मिती केली जाते. कमीत कमी कामगारांचा वापर करून आम्ही येथील उत्पादन सुरू केले आहे असे कंपनीचे अध्यक्ष रवी गोगिया यांनी सांगितले. कामगार दिल्या जात असलेल्या प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद देत आहेत. लवकरच उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकेल असे त्यांनी सांगितले.