बंगळुरू – टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीच्या बिदाडी येथील दोन कारखान्यातील काम सुरू करण्यात आले आहे. मात्र कामगारांचे आंदोलन चालूच आहे.
जे कामगार काम करीत आहेत त्यांची मदत घेऊन उत्पादन सुरू करण्यात आले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 10 नोव्हेंबर रोजी कामगारांच्या संपानंतर या कारखान्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती.
नंतर कर्नाटक सरकारच्या मध्यस्थीमुळे 19 नोव्हेंबर रोजी काम सुरू करण्यात आले होते. मात्र कामगाराचे सहकार्य नसल्यामुळे काम पुन्हा बंद करण्यात आले होते. आता बरेच कामगार काम करीत असल्यामुळे उत्पादन सुरू करण्यात आले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.