Wonder Woman 1984 या चित्रपटाबाबत मागील बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक वर्गामध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. इस्रायली सुपरस्टार गल गॅडोट हिनं सोशल मीडियावर एक अफलातून व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या आगामी चित्रपटाची झलक पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
दुबईतील जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा या इमारतीवर Wonder Woman 1984ची झलक पाहायला मिळत असल्याचा एक व्हिडीओ गलनं शेअर केला. काही तासातच हा व्हिडियो २.६ मिलियन युजर्सने बघितला आहे. सध्या या व्हिडियोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. यामध्ये रात्रीच्या वेळी, अंधाराच्या पार्श्वभूमीवर ‘वंडर वुमन’मुळं झळाळून निघलेल्या या इमारतीनं अनेकांचेच डोळे दीपवले.
आता हॉलीवूडमध्ये भारतीयांसाठी चांगल्या भूमिका – रवी पटेल
यंदाच्या ख्रिसमसच्या निमित्तानं Wonder Woman 1984 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारतामध्ये हा चित्रपट नाताळ सणाच्या एक दिवस आधी म्हणजेच 24 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातून क्रिस्टन वीग, पेड्रो पास्कल, कोनी नेलसन, रॉबिन राईट यांच्यासोबतच गल गॅडोटही झळकणार आहे. भारतीय-अमेरिकन अभिनेता रवी पटेल “वंडर वूमन 1984′ मध्ये दिसणार आहेत. रवी म्हणाला, मी सहमत असून हे वास्तव आहे. मला वाटते की, त्या दृष्टीने मी खूपच भाग्यवान आहे.