फिनआयक्यू एटीटी आशियाई मानांकन महिला टेनिस
पुणे – नवनाथ शेटे स्पोर्टस अकादमी यांच्या तर्फे एमएसएलटीए यांच्या सहकार्याने आयोजित व आशियाई टेनिस संघटना व अखिल भारतीय टेनिस संघटना, पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्यावहिल्या 3000डॉलर पारितोषिक रकमेच्या फिनआयक्यू एटीटी आशियाई मानांकन महिला टेनिस स्पर्धेत साई संहिता चमर्थी, वैदेही चौधरी, सोहा सादिक, प्रतिभा नारायण प्रसाद या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मेट्रोसिटी स्पोर्टस क्लब, कोथरूड येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या गुजरातच्या वैदेही चौधरी हिने हैद्राबादच्या निधी चिलूमुलाचा 6-4, 7-5 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरी गाठली. अव्वल मानांकित तामिळनाडूच्या साई संहिता चमर्थीने आपली विजयी मालिका कायम ठेवत रिया उबवेजाचा 6-1, 6-0 असा एकतर्फी पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
चुरशीच्या झालेल्या लढतीत दोन तास चाललेल्या या सामन्यात आंध्रप्रदेशच्या सोहा सादिक हिने वंशिता पठानियाचा 6-3, 7-5 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. कर्नाटकच्या प्रतिभा नारायण प्रसाद हिने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या बेला ताम्हणकरचा 6-3, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली.
सविस्तर निकाल –
उपांत्यपूर्व फेरी – महिला गट -साई संहिता चमर्थी (भारत) वि.वि. रिया उबवेजा (भारत) 6-1, 6-0, वैदेही चौधरी (भारत) वि.वि. निधी चिलूमुला (भारत) 6-4, 7-5, सोहा सादिक (भारत) वि.वि. वंशिता पठानिया (भारत) 6-3, 7-5, प्रतिभा नारायण प्रसाद (भारत) वि.वि. बेला ताम्हणकर (भारत) 6-3, 6-1.