#Womens_T20WorldCup : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उद्धघाटनाचा सामना

दुबई – महिलांच्या टी- 20 विश्वचषक 2020 स्पर्धेच्या उद्धघाटनाचा सामना 21 फेब्रुवारी रोजी यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सिडनी मैदानावर रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने 2018 सह विक्रमी चार वेळा टी- 20 विश्वचषक पटकाविलेला आहे.

तर मागील विश्वचषकात भारतीय महिला संघाने साखळी सामन्यात त्यांना पराभवाचा दणका दिला होता. त्यामुळे या सामन्याने विश्वचषकाची सुरुवात थाटात होईल याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या स्पर्धेतील सराव सामने हे 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान ऍडलेड आणि ब्रिस्बेनच्या मैदानांवर खळवले जाणार आहेत. तर मुख्य स्पर्धा 21 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान पार पडेल. 21 फेब्रुवारीच्या उद्धघाटन सामन्यांनंतर भारताची पुढील लढत पर्थच्या मैदानावर 24 फेब्रुवारी रोजी पात्रता फेरीतून आलेल्या संघाविरुद्ध असेल तर 27 फेब्रुवारीला न्यूझीलंड आणि 29 फेब्रुवारीला श्रीलंकेशी सामने होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)