ICC Women’s T20 World Cup 2024 (IND vs NZ) : – युएईमध्ये यावेळी महिला टी-20 विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघही या स्पर्धेत सहभागी होत आहे. भारतीय महिला संघ आपल्या टी-20 विश्वकरंडक मोहिमेला आजपासून सुरुवात करणार आहे. यामध्ये भारतासमोर न्यूझीलंड संघाचे आव्हान असणार आहे.
या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा समावेश ‘अ’ गटात करण्यात आला आहे. या गटामध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका व न्यूझीलंड या संघाचा समावेश आहे. या मोहिमेची सुरुवात शुक्रवारी न्यूझीलंड संघापासून होणार आहे. आजच्या लढतीमध्ये स्मृती मंधाना, शेफाली वर्मा व कर्णधार हरामनप्रीत कौर यांच्यावर भारतीय फलंदाजीची मदार असणार आहे.
भारताच्या अनुभवी खेळाडू कर्णधार हरामनप्रीत कौर, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा व दीप्ती शर्मा यांच्याकडून भारताला मोठ्या आशा आहेत. भारतीय महिला संघाला कधीही विश्वचषक विजेतेपद मिळवता आलेले नाही. यावेळीही आव्हान सोपे नसेल. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या पहिल्या सामन्याशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊया.
1. सामना कधी खेळला जाईल?
महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना शुक्रवार, 4 ऑक्टोबर रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार (IST) संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.
2. सामना कुठे खेळला जाईल?
महिला T20 विश्वचषक 2024 मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
3. सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहायचं?
तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणारा T20 विश्वचषक 2024 सामना पाहू शकता. सामन्याचे लाइव स्ट्रीमिंग Disney + Hotstar वर उपलब्ध असेल. तुम्ही Disney + Hotstar वर हा सामना विनामूल्य पाहू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही सबस्क्रिप्शनची गरज भासणार नाही.
It’s Match Day 🙌
🆚 New Zealand
⏰ 7:30 PM IST
🏟️ Dubai International Cricket Stadium
💻📱 https://t.co/oYTlePtFaz#TeamIndia | #T20WorldCup | #INDvNZ | #WomenInBlue pic.twitter.com/LuQhcFtXWG— BCCI Women (@BCCIWomen) October 4, 2024
दोन्ही सराव सामन्यात भारतानं मारली बाजी…
विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारतीय महिला संघाने दोन सराव सामने खेळले. जिथे टीम इंडियाने दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. टीम इंडियाने 2016 च्या चॅम्पियन टीम वेस्ट इंडिजचा पहिल्या सराव सामन्यात पराभव केला. यानंतर टीम इंडियाने पुढच्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 28 धावांनी पराभव केला.
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, यादव, यादव श्रेयंका पाटील, संजना संजीवन.
न्यूझीलंड : सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, इझी गझ, मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, फ्रॅन जोनास, लेह कॅस्परेक, मेली केर, जेस केर, रोझमेरी मायर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रोवे, ली टाहुहू .
Women’s T20 World Cup 2024 : भारताची विश्वचषक मोहीम आजपासून! विजयी पाऊल टाकायला हरमनप्रीतसेना सज्ज…
दरम्यान, चालू हंगामात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. यामध्ये सलामीवीर असलेल्या स्मृती मंधानाने न्यूझीलंड विरुद्ध खेळताना 134.93 च्या स्ट्राईक रेटने 197 धावा केल्या असून यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. शेफाली वर्मा देखील या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात धावा करत आहे.
गोलंदाजीच्या बाबतीत रेणुका सिंग, पूजा वस्त्राकर आणि अरुंधती रेड्डी यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे. भारताकडे सध्याच्या घडीला ऑफस्पिनर दीप्ती आणि श्रेयांका पाटील, लेग स्पिनर आशा शोभना व डावखुऱ्या राधा यादवचा समावेश आहे. मात्र यापैकी केवळ दोन किंवा तीन खेळाडूंना संधी मिळू शकेल.
भारताच्या बरोबरीने न्यूझीलंडच्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. कर्णधार सोफी डेव्हाईन, अनुभवी अष्टपैलू सुझी बेट्स, ली ताहुहू आणि लेह कॅस्परेक हे खेळाडू न्यूझीलंडसाठी महत्वाची भूमिका बजावतील.