Women’s T20 World Cup 2024 (IND-W vs NZ-W Score Update) : आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाच्या चौथ्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड महिला संघ आज आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा स्पर्धेतील पहिला सामना असणार आहे. अशा स्थितीत दोन्ही संघ विजयाने सुरुवात करतील. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
किवी संघाची कर्णधार सोफी डेव्हाईनने (Sophie Devine) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 20 षटकात 4 गडी गमावत 20 षटकात 160 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 161 धावांचे कठिण लक्ष्य असणार आहे.
Innings Break!
New Zealand post 160/4 in the first innings.
2⃣ wickets for Renuka Singh Thakur
A wicket each for Arundhati Reddy & Asha SobhanaStay tuned for #TeamIndia‘s chase.
Scorecard ▶️ https://t.co/XXH8OT5MsK#T20WorldCup | #INDvNZ | #WomenInBlue pic.twitter.com/65P4YU72V9
— BCCI Women (@BCCIWomen) October 4, 2024
सुझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 7.4 षटकात 67 धावांची भागीदारी झाली, जी अरुंधती रेड्डीने मोडली. तिने बेट्सला श्रेयंका पाटीलकरवी झेलबाद केले. तिनं 24 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 27 धावांची खेळी केली. त्यानंतर लगेचच पुढच्या (8.1) षटकात 67 धावसंख्येवरच भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला आहे. आशा शोभनाने जॉर्जिया प्लिमरलाही मंधानाकरवी झेलबाद केले. ती 23 चेंडूत 3 चौकार अन् 1 षटकाराच्या मदतीने 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.
यानंतर अमेलिया केर आणि सोफी डिव्हाईन यांनी पदभार स्वीकारला. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 99 पर्यंत नेली. रेणुका सिंगने 15 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर केरला बाद केले. अमेलिया केर 22 चेंडूत केवळ 13 धावा करून माघारी परतली. यानंतर ब्रूक हॅलिडेने कर्णधाराला साथ दिली. दोघांमध्ये 46 धावांची भागीदारी झाली आणि संघाची धावसंख्या 145 वर पोहचवली. ही भागीदारी रेणुकाने 19व्या षटकात मोडली. ब्रूक 12 चेंडूत 2 चौकारासह 16 धावा करून बाद झाली. यांनतर सोफी डिव्हाईन हिने 36 चेंडूत 7 चौकाराच्या मदतीनं नाबाद 57 धावा करून तर मॅडी ग्रीन हिने नाबाद पाच धावा करून संघाची धावसंख्या 20 षटकात 160 धावांपर्यंत नेली.
Women’s T20 World Cup 2024 : द. आफ्रिकेची धडाकेबाज सुरुवात, वेस्ट इंडिजचा केला दारूण पराभव…
भारतातर्फे गोलंदाजीत रेणुका ठाकुर सिंहने 4 षटकात 27 धावा देत सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. अरुंधती आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अरूंधतीनं 4 षटकात 28 तर शोभना हिनं 4 षटकात 22 धावा दिल्या. अष्टपैलू दिप्ती शर्मा महागडी गोलंदाज ठरली. तिने 4 षटकात सर्वाधिक 45 धावा दिल्या. श्रेयका पाटीलला बळी मिळवण्यात अपयश आले. तिने 3 षटकात 25 धावा दिल्या.