Women’s T20 World Cup 2024 (IND vs AUS Toss Update) : महिला टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आज महत्त्वाचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला विजयासोबत नेट रनरेटवरही काम करावे लागणार आहे.
या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला 61 किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकाने हरवले तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. पण भारत 20 धावांनी हरला तर त्यांना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहावी लागेल. अशा स्थितीत न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध 37 धावांनी जिंकता कामा नये, तर भारताची पुढील वाट मोकळी होईल.
तत्पूर्वी, नाणेफेकीचा झालेला कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं लागला आहे. संघाची कर्णधार ताहलिया मॅकग्रा हिने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. (Australia won the toss and elected to bat) त्यामुळे टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावे लागेल. नियमीत ऑस्ट्रेलियन कर्णधार ॲलिसा हिली दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. तिच्या जागी ताहिला मॅकग्रा संघाचे नेतृत्व करेल.
🚨 Toss Update 🚨
Australia win the toss, #TeamIndia will be bowling first in Sharjah
Follow the match ▶️ https://t.co/Nbe57MXNuQ#T20WorldCup | #INDvAUS | #WomenInBlue pic.twitter.com/d2OGNzrlEw
— BCCI Women (@BCCIWomen) October 13, 2024
असं आहे उपांत्य फेरीचं समीकरण….
ऑस्ट्रेलियाचे तीन सामन्यांतून सहा गुण आहेत आणि त्यांचा रनरेट +2.786 आहे. यासह ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे तर उर्वरित स्थानांसाठी भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान शर्यतीत आहेत. भारताचे चार गुण आहेत आणि बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी एक विजय आवश्यक आहे कारण न्यूझीलंडला देखील अजून एक सामना खेळायचा आहे आणि ते सहा गुणांसह अंतिम चारमध्ये पोहोचू शकतात. अशा स्थितीत उपांत्य फेरीत पोहचण्याचं समीकरण नेट रन रेटवर जाईल. त्यामुळे भारताला मोठा विजय आवश्यक आहे.
भारताचा निव्वळ रन रेट सध्या +0.567 आहे तर न्यूझीलंडचा रनरेट +0.282 आहे. पाकिस्तानचे तीन सामन्यांतून दोन गुण आहेत. जर त्यांनी शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला हरवले आणि भारत ऑस्ट्रेलियाकडून हरला तर सर्व संघांचे चार गुण होतील आणि पुढचे गणित नेट रन रेटवर येईल. त्यामुळे भारतीय संघाला फक्त जिंकायचे नाही तर मोठ्या फरकाने जिंकायचे आहे.