Women’s T20 World Cup 2024 (IND vs AUS) : आयसीसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेस गुरुवारपासून युएई (UAE) मध्ये सुरूवात झाली आहे. भारतीय संघ सहा वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासह अ गटात आहे, तर ब गटात बांगलादेश, 2009 चे चॅम्पियन इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, 2016 चे विजेते वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे.
यादरम्यान, माजी फिरकीपटू हरभजन सिंगने गट टप्प्यातील भारताच्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल आपले मत सामायिक केले आणि म्हटले आहे की, ‘हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध “खूप सावधगिरी बाळगणे” आवश्यक आहे. कारण ते त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान बनू शकतात.’
भारत शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल आणि पुढील 6 ऑक्टोबरला पाकिस्तानशी सामना करेल. 9 ऑक्टोबर रोजी ते श्रीलंकेशी खेळतील आणि त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी शेवटच्या गट सामन्यात त्यांचा विक्रमी सहावेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी सामना होईल.
हरभजन पुढे म्हणाला की, “मला वाटते की ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारताने खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या गटाकडे पाहता भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या गटात आहेत. हे सर्व सामने नक्कीच महत्त्वाचे असतील. पण एक सामना जो माझ्या मते थोडा कठीण असेल तो म्हणजे भारत-ऑस्ट्रेलिया सामना. कारण ऑस्ट्रेलिया हा एक बलाढ्य संघ आहे. हे सामने दुबईत उपखंडातील खेळपट्ट्यांवर खेळवले जात आहेत, जे भारतीय संघासाठी घरच्या परिस्थितीइतके अनुकूल नसतील. पण ऑस्ट्रेलिया, कुठेही, कसल्याही खेळपट्ट्यावर खेळले तरी त्यांना पराभूत करणे कठीण आहे. त्यामुळे भारतासमोर सर्वात मोठे आव्हान ऑस्ट्रेलियाचे असू शकते. श्रीलंकेविरुद्धही भारताला सावध राहावे लागणार आहे. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करून श्रीलंकेने उलटफेर केला होता. मागील एका मालिकेतही श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे भारताविरुद्ध त्यांचे मनोबल उंचावलेले असेल. त्यामुळे हा सामनाही चांगला होईल.”
हरभजनचे हे मूल्यांकन चुकीचे नाही कारण ऑस्ट्रेलियाने 32 टी-20 सामन्यांमध्ये भारताला 23 वेळा पराभूत केले आहे, तर भारतीय संघ या कालावधीत केवळ सात सामने जिंकू शकला आहे. भारतीय महिलांना आशा आहे की, 2024 ते त्यांचा पहिला आयसीसी विश्वचषक जिंकण्याचे वर्ष असेल. कारण भारत 2020 मध्ये टी-20 विश्वचषक आणि 2005 आणि 2017 मध्ये 50 षटकांच्या स्पर्धेत तीन वेळा उपविजेता ठरला आहे.
IND vs BAN : कसोटी मालिका संपली! आता सुरू होणार टी-20 चा थरार; जाणून घ्या कधी-कुठे होणार सामने?
मेगा इव्हेंटमध्ये भारताच्या संधींबद्दल बोलताना हरभजन म्हणाला, “टीम इंडिया या स्पर्धेत पराभूत करणारा संघ असेल. माझ्या मते भारतीय संघ खूप मजबूत आहे. त्याच्याकडे अनुभवी आणि युवा असे दोन्ही खेळाडू आहेत. हरमन आणि स्मृती चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि दीप्ती ही अविश्वसनीय फिरकीपटू आहे. भारत खूप सक्षम संघ आहे आणि खूप चांगले क्रिकेट खेळत आहे. संघ मजबूत दिसत आहे. जर टीम इंडियाने एकंदरीत चांगले क्रिकेट खेळले तर मला विश्वास आहे की ते ही स्पर्धा नक्की जिंकतील.”
टीम इंडिया तीन वेळा राहिली आहे विजेतेपदाची दावेदार….
भारत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि गेल्या तीन महिला टी-20 विश्वचषकांच्या किमान उपांत्य फेरीत पोहोचला आहे. हरभजनने भारतीय संघाला मोकळेपणाने खेळण्याचा आणि एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला की “तुम्ही दडपण न घेता सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकजुटीने खेळल्यास निकाल आपोआपच मिळतील. फार दूरचा विचार न करता छोटी पावले उचला आणि एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करा. मला आशा आहे की त्यांनी या गोष्टींचे पालन केले तर आपला संघ नक्कीच चांगली कामगिरी करेल.”