पुनीत बालन ग्रुप संघाची विजयी सलामी

महिला प्रीमियर लीग क्रिकेट

पुणे  – हेमंत पाटील ग्रुप आयोजित एचपी महिला प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पुनीत बालन ग्रुप संघाने विजयी सलामी दिली. तर, अन्य लढतीत विजय मिळवत एचपी रॉयल्स या संघाने सलग दुसरा विजय नोंदविला.

या स्पर्धेत पहिल्या सामन्यात किर्थी (19 धावा व 3 बळी) हिने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पुनीत बालन ग्रुप संघाने वॉरियर्स स्पोर्टस संघाचा 9 धावांनी पराभव करून विजयी सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना पीबी ग्रुप संघाने 20 षटकात 6 बाद 114 धावा केल्या. यात शिल्पा साहूहिने संयमपूर्ण फलंदाजी करताना 45 चेंडूत 7 चौकरांच्या साहाय्याने 41 धावांची खेळी केली. शिल्पाला किर्थी 19, उत्कर्षा पवार 18 यांनी धावा काढून सुरेख साथ दिली. वॉरियर्स स्पोर्टसकडून स्नेहल प्रधान (1-19), माया सोनावणे (1-26), संजना वाघमोडे (1-26) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

या आव्हानाचा पाठलाग करताना वॉरियर्स स्पोर्टस संघाला 20 षटकात 9 बाद 105 धावाच करता आल्या. यामध्ये माया सोनावणे 22, सायली लोणकर 28 व तेजश्री ननावरे 19 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पुनीत बालन ग्रुपकडून किर्थी हिने फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही चमक दाखवत 17 धावात 3 गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

स्वानंजली मुळ्ये 18 धावात 2 गडी, तर आयुशी सोनीने 15 धावात 1 गडी बाद करून किर्थीला साथ दिली. सामन्याची मानकरी किर्थी ठरली.
दुसऱ्या सामन्यात ऋतुजा गिलबिले (52 धावा), आदिती गायकवाड (44 धावा) व अनुजा पाटील (26 धावा) यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर एचपी रॉयल्स संघाने आर्या स्पोर्टस संघाचा धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळविला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल – साखळी फेरी – पुनीत बालन ग्रुप – 20 षटकात 6 बाद 114 धावा. (शिल्पा साहू 41, किर्थी 19, उत्कर्षा पवार 18, स्नेहल प्रधान 1-19, माया सोनावणे 1-26, संजना वाघमोडे 1-26) वि. वि. वॉरियर्स स्पोर्टस – 20 षटकात 9 बाद 105 धावा. (माया सोनावणे 22, सायली लोणकर 28, तेजश्री ननावरे 19, किर्थी 3-17, स्वानंजली मुळ्ये 2-18, आयुशी सोनी 1-15). सामनावीर – किर्थी. एचपी रॉयल्स – 20 षटकात 5 बाद 141 (आदिती गायकवाड 44, ऋतुजा गिलबिले 52, अनुजा पाटील 26, गौतमी नाईक 1-32, मोना मेश्राम 1-18) वि. वि. आर्या स्पोर्टस – 20 षटकात 5 बाद 99 धावा. (अंबिका वाटाडे 32, किरण नवगिरे 35, मोना मेश्राम 13, पूनम खेमनार 2-12, अनुजा पाटील 1-18). सामनावीर – अनुजा पाटील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.