जागतिक आर्थिक मंचावर महिलांची उपस्थिती वाढली

दावोस – जागतिक आर्थिक मंचच्या बैठकीत महिलांनी जवळपास 22 टक्‍के सहभाग नोंदवला आहे. एकूण 3 हजार प्रतिनिधींमध्ये 696 महिलांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षातील महिलांच्या सहभागाचा आकडा पाहता तो प्रतिवर्षी वधारत आहे.

मंचच्या संमेलनामध्ये 119 देशातील शिष्टमंडळांनी सहभाग घेतला आहे. नॉर्वेमधील प्रतिनिधीची संख्या सर्वाधिक म्हणजे 37 टक्‍के आहे. त्याबरोबर भारतीय महिलांचा सहभाग 13.2 असल्याची नोंद करण्यात आली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महिला प्रतिनिधींनी सलग तिसऱ्य़ा वर्षातही फायदा घेतला आहे. यावेळी सात सदस्यांमधील चार महिला सदस्य असल्याचे स्पष्टीकरण ही यावेळी दिले आहे. इराकची बासिमा आणि स्वीडनमधील नोरा आणि जपानची अकीरा सकानो तर अमेरिकेतील ज्यूलिया व स्वीडनची बरोबुला यांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्य़ा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जगभरातील व्यवसायातील प्रतिनिधी सरकारी अधिकारी आणि अन्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवर यात सहभाग घेतात. हा कार्यक्रम 25 जानेवारी 2019 पर्यंत सुरू राहणार असल्याचे नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)