नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपांमुळे महिलांसाठीचे राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर रद्द करण्यात आले आहे. त्याचवेळी, भारतीय क्रीडा प्राधिकरणाने कुस्ती महासंघाकडून या आरोपांवर ७२ तासांत उत्तर मागितले आहे. ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल पदक विजेत्या कुस्तीपटूंनी अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.
Union Sports Ministry sought an explanation from Wrestling Federation of India (WFI) and directed it to furnish a reply within the next 72 hours on the allegations levelled by wrestlers, including Olympic and CWG medalists: Sports Authority of India pic.twitter.com/w2C4FhyvFX
— ANI (@ANI) January 19, 2023
दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी कांस्यपदक जिंकणारा बजरंग पुनिया आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी साक्षी मलिक यांनीही विनेश फोगटला पाठिंबा दिला आहे. आपले दु:ख व्यक्त करताना विनेश म्हणाली, “टोकियो ऑलिम्पिकनंतर मला फेडरेशन आणि ब्रिजभूषण सिंग यांनी देशद्रोही ठरवले. अध्यक्ष म्हणाले की, ”मी खोटे नाणे आहे. संपूर्ण देशाला त्याचा अर्थ माहित आहे.”
‘माझ्याविरुद्ध चुकीच्या गोष्टी लिहिल्या गेल्या’
विनेश पुढे म्हणाली,”टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराभूत झालेल्या खेळाडूंचा मानसिक छळ करण्यात आला. त्यावेळी जे प्रशिक्षक होते त्यांना कागदपत्रांवर सह्या करण्यास भाग पाडण्यात आले… माझ्या विरोधात चुकीच्या गोष्टी लिहिण्यात आल्या आणि मी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, फेडरेशनने त्यांना स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. महिला खेळाडूंचे मुख्य प्रशिक्षक WFI अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांना घाबरतात.”