परळी – काकीनाडा पोर्ट येथून शिर्डीकडे जात असलेली एक्सप्रेस रेल्वेला परळी – गंगाखेड दरम्यान सिग्नलमध्ये बिघाड करुन थांबवत चोरांनी लूट केली. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
याप्रकरणी उशिरापर्यंत रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. परळी हे नांदेड व सिकंदराबाद विभागांना जोडणारे रेल्वे स्टेशन आहे.
परळीमार्गे दररोज किमान 25 रेल्वेगाड्या धावत असतात. काकीनाडा पोर्ट ते साईनगर शिर्डी ही एक्सप्रेसनेहमीप्रमाणे शनिवार रोजी रात्री 11.45 वाजतापरळी रेल्वेस्थानकातून सुटली.
त्यानंतरउखळी ते वडगाव निळा दरम्यान असलेल्याआऊटर सिग्नलला बिघाड करत ही रेल्वेथांबवण्यात थांबवण्यात आली. काही जणांनीरेल्वेत शिरुन आतील प्रवाशांची लूट केली. याच दरम्यान वडगाव निळा स्टेशनवर तैनात रेल्वे पोलिसांनी धाव घेताच चोरट्यांनी पलायनकेले.
घटना घडली ते ठिकाण सोनपेठ पोलिसठाण्याच्या हद्दीत येत असले तरी याबाबतअद्याप तक्रार दाखल करण्यासाठी कुणीही आलेले नसल्याने तक्रार दाखल नसल्याचे परळी रेल्वे पोलिस ठाण्याचे पीएसआय सोमनाथ वाघमोडे यांनी सांगितले.
दोन दिवसापूर्वीच घाटनांदुर स्थानकावर प्रवाशांना लुटल्याची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.