Womens IPL Team Auction – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुरुषांच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या बलाढ्य यशानंतर आता आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. बीसीसीआयकडून लवकरच महिला आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार आहे. मागील काही दिवसांपासून या स्पर्धेच्या आयोजनाबाबत मोठी चर्चा सुरु होती.
ICC ODI Ranking | मोहम्मद सिराजची दिग्गजांवर मात; बनला जगातील अव्वल गोलंदाज
बीसीसीआयने ही महिला आयपीएल स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली असून बीसीसीआयला यामध्ये यशही मिळत आहे. याअगोदर या स्पर्धेच्या मीडिया राईट्समधून आणि आता फ्रँचायझींच्या बोलीमधून बीसीसीआयला मोठी कमाई झाली आहे. पाच संघांच्या लिलावामधून बीसीसीआयला ४६६९.९९ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून दिली आहे.
Today is a historic day in cricket as the bidding for teams of inaugural #WPL broke the records of the inaugural Men’s IPL in 2008! Congratulations to the winners as we garnered Rs.4669.99 Cr in total bid. This marks the beginning of a revolution in women’s cricket and paves the
— Jay Shah (@JayShah) January 25, 2023
ICC ODI Ranking | मोहम्मद सिराजची दिग्गजांवर मात; बनला जगातील अव्वल गोलंदाज
महिला आयपीएल स्पर्धेच्या मीडिया राईटससाठीच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये वायकॉम १८ ने तब्बल ९५१ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली आणि हे अधिकार त्यांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता पुढील पाच वर्षांसाठी प्रसारणाबाबतचे हक्क वायकॉम १८ कडे असणार आहेत. त्याचबरोबर आता या स्पर्धेसाठीच्या पाच संघांची नवे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटींत अहमदाबाद फ्रँचायझीचे हक्क जिंकले आहेत.
त्याचबरोबर या लिलावात मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरूला खरेदी केले. कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत लखनौ आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत दिल्लीचे हक्क जिंकले आहेत. या स्पर्धेच्या विजेत्या संघाला ६ कोटी आणि उपविजेत्या संघाला ३ कोटी रुपये दिले जातील. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या संघाला एक कोटी रुपये दिले जातील.
𝐁𝐂𝐂𝐈 𝐚𝐧𝐧𝐨𝐮𝐧𝐜𝐞𝐬 𝐭𝐡𝐞 𝐬𝐮𝐜𝐜𝐞𝐬𝐬𝐟𝐮𝐥 𝐛𝐢𝐝𝐝𝐞𝐫𝐬 𝐟𝐨𝐫 𝐖𝐨𝐦𝐞𝐧’𝐬 𝐏𝐫𝐞𝐦𝐢𝐞𝐫 𝐋𝐞𝐚𝐠𝐮𝐞.
The combined bid valuation is INR 4669.99 Cr
A look at the Five franchises with ownership rights for #WPL pic.twitter.com/ryF7W1BvHH
— BCCI (@BCCI) January 25, 2023
या पाच फ्रँचायझींनी मारली बाजी
१. अदानी स्पोर्ट्सलाइन प्रा.लि – अहमदाबाद १२८९ कोटी
२. इंडियाविन स्पोर्ट्स प्रा.लि (रिलायन्स ग्रुप) – मुंबई, ९१२.९९ कोटी
३. रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रा.लि – बेंगळुरू ९०१ कोटी
४. JSW GMR क्रिकेट प्रा.लि – दिल्ली ८१० कोटी
५. कॅप्री ग्लोबल होल्डिंग्ज प्रा.लि – लखनौ ७५७ कोटी