महिला हाॅकी : शेवटच्या सामन्यात पराभूत होऊनही भारताने मालिका जिंकली

कॅनबेरा : भारतीय ज्युनियर महिला हाॅकी संघाला रविवारी तिंरगी स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून २-१ असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र चार सामन्यांची ही मालिका भारतीय संघाने जिंकली.

अखेरच्या सामन्यात भारताचे आणि ऑस्ट्रेलियाचे मालिकेत समसमान ७ गुण होते, मात्र गोल फरकामुळे भारत विजयी ठरला.

सामन्यात ऑस्ट्रेलियाने १५ मिनिटांत गोल करत आघाडी मिळवली होती. मात्र भारताच्या गगनदीप कौरने ५३ व्या मिनिटांनी गोल करत १-१ ने बरोबरी साधली होती. मात्र, सामन्याच्या ५६ व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाकडून एबिगेल हिने गोल करत ऑस्ट्रेलियाला २-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. भारताने शेवटच्या काही मिनिटात बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न केले मात्र हाती अपयश आले आणि ऑस्ट्रेलियाने सामना २-१ ने जिंकला.

Leave A Reply

Your email address will not be published.