वुमेन्स हेल्पलाइनने बालविवाह रोखला

पिंपरी – चिंचवड येथील विद्यानगरमध्ये अल्पवयीन बालविवाहचा प्रयत्न पोलीस आणि वुमेन्स हेल्पलाइनने रोखला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) घडली. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीची सुटका करीत वधू व वराच्या नातेवाइकांना नोटीस बजावली आहे.

याबाबत माहिती देताना वुमेन्स हेल्पलाइनच्या अध्यक्षा नीता परदेशी म्हणाल्या, आम्हाला बालविवाहाबाबत एक निनावी फोन आला. त्यानुसार संस्थेच्या पदाधिकारी ऍड. सारिका परदेशी, अलका भास्कर, मंगला मुऱ्हे, वंदना पिल्ले, सारिका कांबळे यांनी तेथे विवाहस्थळी धाव घेतली.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनाही याबाबतची माहिती दिली. त्यांच्या आदेशानंतर पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एका अल्पवयीन मुलीच्या घरातच लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. लग्नस्थळावरून पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, मुलावर कोणतीच कारवाई केली नसल्याचे हेल्पलाइनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक पोलिसांनी याबाबत अधिक सहकार्य न केल्याची खंत परदेशी यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.