सांगलीतील पूरग्रस्त महिलांनी ‘एनडीआरएफ’च्या जवानांना बांधल्या राख्या

सांगली – अतिवृष्टीमुळे कोल्हापूरसह सांगलीत महापूर आला. त्यामुळे पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले. त्यानतंर कोल्हापूर-सांगलीत महापूरासारखे मोठे संकट आल्यानंतर एनडीआरएफ, लष्कर आणि नेव्हीने युद्धपातळीवर मदत केली व अजूनही त्यांचे बचावकार्य सुरू आहे.

यादरम्यान, एक आगळेवेगळे चित्र सांगलीमधील झुलेलाल येथील चौकात पाहायला मिळाले. जवानांनी केलेल्या मदतीनंतर सांगलीतल्या मायभगिनींनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना महापुरातून वाचवणाऱ्या ‘नौदल’ आणि ‘एनडीआरएफ’च्या जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यामध्ये महिला पोलिसही सहभागी झाल्या होत्या. या दृष्याने सर्वजण भारावून गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.