#महिला_दिन_विशेष : जाणून घ्या क्रिकेटपटू स्मृति मंधाना यांच्याविषयी सर्वकाही

भारतात क्रिकेट या खेळाला लोक धर्म मानतात.  त्यामुळे कोणताही सामना असो तो पाहणार्‍या लोकांची आपल्या देशात कमी नाही.  त्याचबरोबर या खेळांच्या क्षेत्रातील चर्चा छापून सुद्धा येतात आणि लोक त्या आवडीने वाचतात.  परंतु याच क्रिकेटमध्ये जेव्हा महिलांची गोष्ट येते,  तेव्हा मात्र प्रचंड उदासीनता दिसून येते.  महिलांच्या क्रिकेट क्षेत्राकडे दुर्लक्ष केले जाते.

त्यामुळे बर्‍याच लोकांना महिला क्रिकेटरांबद्दल माहितीच नसते. परंतु आज आपण महिला दिनानिमित्त एका अशा महिला क्रिकेटपटू बद्दल जाणून घेणार आहोत.  ज्या महिला क्रिकेटपटूने या क्रिडा विश्वात आपली वेगळी निर्माण केली आणि आपल्या देशांचे नाव सुद्धा उज्वल केले.  ती महिला क्रिकेटपटू आहे स्मृति मंधाना.  त्यामुळे आज आपण तिच्याबद्दल जाणून घेऊया..

स्मृति मंधानाचे नाव 2017 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकाशझोतात आले. जेव्हा तिने इंग्लंड विरुद्ध झालेल्या क्वालिफायर सामन्यात बहुमूल्य 90 धावांची खेळी केली होती. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध 106 धावांची खेळी साकारली होती. त्याचबरोबर भारतीय महिला संघाला अंतिम सामन्यात पोहचवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृति मंधानाचा जन्म 18 जुलै 1996 साली मुंबई येथे झाला. तिच्या आईचे नाव स्मिता आणि वडिलांचे नाव श्रीनिवास मंधाना आहे.  त्याचबरोबर तिच्या भावाचे नाव श्रवण आहे.  जेव्हा स्मृति दोन वर्षाची होती तेव्हाच तिचे कुटुंब सांगली येथील माधवनगर येथे स्थलांतरित झाले. त्यामुळे स्मृति मंधानाचे प्रारंभी शिक्षण हे माधवनगर येथेच झाले. तिचे पदवीचे शिक्षण वाणिज्य शाखेतून चिंतामणराव कॉलेज मध्ये पूर्ण केले.

स्मृति लहान असताना तिचा भाऊ श्रवण क्रिकेट खेळत असायचा त्यामुळे त्याला पाहून तिला ही क्रिकेटबद्दल आवड निर्माण झाली. त्यामुळे तिने प्रशिक्षक अनंत तांबेकर यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्याचबरोबर स्मृति लहान असल्यापासून मुलांच्या क्रिकेट खेळात सहभाग घेत असत. तिने लहानपणापासून आपल्या भावाचा आदर्श घेवून डावखुरा फलंदाज होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि त्यानुसार मेहनत घ्यायला सुरुवात केल.

याचे फलित म्हणून अवघ्या 9 वर्षाची असताना तिची महाराष्ट्राच्या 15 वर्षाखालील संघात निवड झाली. त्यांनंतर ही तिने आपल्या मेहनती मध्ये कोणत्याही प्रकारचा खंड न पडू देता कठोर मेहनत घेतली. 15 वर्षाच्या वयोगटात उत्तम कामगिरी केल्यामुळे तिची 19 वर्षांखालील संघात वयाच्या 11 वर्षी निवड झाली.

आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात :

स्मृति मंधानाने आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना 5 एप्रिल 2013 साली भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना बांग्लादेश विरुद्ध खेळला. त्यानंतर 10 एप्रिल 2013 मध्ये बांग्लादेविरुद्ध पहिला एकदिवसीय अहमदाबाद येथे खेळला. तसेच कसोटी पदार्पण 13 ऑगस्ट 2014 साली इंग्लंड विरुद्ध केले. अशा प्रकारे स्मृतिने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

पहिली गरुड झेप :

स्मृति मंधानाने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिली गरुड झेप तेव्हा घेतली,  जेव्हा ऑक्टोबर 2013 साली एकदिवसीय सामन्यात द्विशतक शतक ठोकले आणि त्याचबरोबर द्विशतक ठोकणारी पहिली महिला खेळाडू ठरली.  हा सामना 19 वर्षांखालील वयोगटात खेळला गेला होता. या सामन्यात 150 चेंडूचा सामना करताना नाबाद 224 धावा पटकावल्या होत्या.
स्मृतीने 2016 मध्ये भारत रेड संघाकडून खेळताना महिला चॅलेंजर ट्रॉफीमध्ये तीन अर्धशतकं ठोकली.  यापैकी अंतिम सामन्यात 82 चेंडूत नाबाद 62 धावांची खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द:

स्मृति मंधानाने आपला पहिला कसोटी सामना इंग्लंड विरुद्ध वर्मस्ली पार्क येथे खेळला. या सामन्यात तिने पहिल्या आणि दुसर्‍या डावात अनुक्रमे 22 आणि 51 धावा काढल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर 2016 मध्ये तिने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुद्धा भाग घेतला होता. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पहिले शतक 2016 मध्ये ठोकली होते. यामध्ये 109 चेंडूत 102 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर 2016 मध्ये आयसीसी महिला संघात निवड होणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.

या संघाचे केले आहे प्रतिनिधित्व :

स्मृति मंधानाने आतापर्यंत ब्रिस्बेन हिट, होबार्ट हरिकेन्स, वेस्टर्न स्टोर्म आणि ट्रेलब्लेझर्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर 2020 मध्ये यूएईत पार पडलेल्या महिला आयपीएल स्पर्धेत स्मृति मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ट्रेलब्लेझर्स संघाने विजेतेपद पटकावले आहे.
आंतरराष्ट्रीय कामगिरी :
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना तिने 75 टी-20, 51 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळलेत. वनडेत चार शतके केली आहेत. कसोटी, वनडे आणि टी-20 अनुक्रमे 81, 2025 आणि 1716 धावा काढल्या आहेत.

स्मृतीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी :

1) स्मृति मंधानाला क्रिकेट व्यतिरिक्त कुकिंग करण्याची सुद्धा आवड आहे. यासाठी तिने 10 वर्षाची असताना कुकिंग क्लास जॉईन केले होते. त्याचबरोबर हॉटेल मॅनेजमेंट करण्याची इच्छा होती. तसेच आपले एक रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार सुद्धा होता. क्रिकेट, कुकिंग आणि त्याचबरोबर ड्राइविंग करण्याची सुद्धा आवड आहे.
2) लहानपणापासून क्रिकेटची आवड असल्याने ती अवघ्या सहा वर्षाची असल्यापासून आपल्या वडील आणि भावासोबत क्रिकेट बद्दल चर्चा करायची. त्याचबरोबर मुलांसोबत ही गल्ली क्रिकेट खेळायची.
3) तिला क्रिकेट खेळण्याची आवड आपल्या भावामुळे निर्माण झाली. तिने आपल्या भावाची कॉपी करत डावखुरा फलंदाजी करायला सुरुवात केली.
4) स्मृति नेहमी आपल्या सोबत एक बॅट ठेवते. मात्र सराव सत्रात कधीच या बॅटचा वापर करत नाही. ही बॅट तिच्या भावाला मिळाली होती आणि त्यावर राहुल द्रविड़ने ऑटोग्राफ दिला होता.
5) जेव्हा तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेव्हा तिला मॅथ्यू हेडन प्रमाणे फलंदाजी करायची होती. परंतु कोचने तिची फलंदाजी पाहून तिला सांगितले की, तुझी फलंदाजी मॅथ्यू हेडन प्रमाणे नाही आहे. त्यामुळे तिने स्वतः ची शैली समजून घ्यायला हवी आणि कुमार संगकाराला आपला आदर्श बनवायला हवा.
6) स्मृति मंधानाची भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सोबत तुलना केली जाते. त्याचबरोबर या दोघांच्या जर्सीचा नंबर 18 हा एकच आहे.

पुरस्कार :

1. 2018 साली आयसीसीचा महिला क्रिकेटर ऑफ़ द् एअर हा पुरस्कार
2. अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.
3. स्पोर्ट्सटर अ‍ॅसेस पुरस्कार 2020
4. विस्डन इंडिया अलमॅनक क्रिकेटर ऑफ़ द् एअर
5. 2018 वुमन्स वनडे क्रिकेटर ऑफ़ द् एअर
6. सिलेक्टेड फॉर 2019 आयसीसी वुमन्स
7. वनडे टीम ऑफ़ द् एअर
8. टी-10 टीम ऑफ़ द् एअर
9. रॅचेल हेयू फ्लिन्ट अवार्ड 2018

-विकास मुढे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.