पुणे – सुनीता संतोष शिंदे यांनी आणे पठारभागावरील शिंदेवाडी गावात कमी पाण्यात शेंद्रिय खताचा वापर करून कोबी व फ्लॉवर च पीक फुलवल आहे. कुटुंब सांभाळत आपल्या शेतीकडे पूर्ण वेळ लक्ष देऊन भरगोस उत्पादन शेतीमधून मिळवत आहे.
कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता शेंद्रिय खत वापरून केमिकल विरहित पीक शेतात घेत आहेत. त्यांच्या शेतीला पाणी कमी असल्याने ठिबक चा वापर करून कमी पाण्यात शेतात पीक पिकवत आहेत.
शेती व पोल्ट्री व्यवसायातून त्यांनी आपल्या पतीला साथ देत कठीण परिस्थितीतुन आपलं कुटुंब सावरलं आहे.जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या पतीला शेतीच्या कामात खंबीर साथ देण्याचं आवाहन केलं आहे.