महिला सक्षमीकरणावरील शॉर्ट फिल्म्स पाठविण्याचे महिला आयोगाचे आवाहन

मुंबई: महिला सक्षमीकरणावर आधारलेला लघुपट (शॉर्ट फिल्म्स) पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाने केले आहे. आयोगाच्या विविध कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये निवडक लघुपट दाखविण्याचा हेतू आहे. राज्य महिला आयोगाकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राज्यभर नियमितपणे केले जात असतात. अशा कार्यक्रमांप्रसंगी आयोगाच्या कामकाजाची माहिती देणाऱ्या व्हिडिओबरोबरच महिला सक्षमीकरणाची प्रेरणा देणारे लघुपटही दाखविण्याची आयोगाची इच्छा आहे. त्याकरिता लघुपट निर्माते, दिग्दर्शक यांनी असे लघुपट पाठवावेत.

लघुपट कमाल पंधरा मिनिटांचा असावा, तो प्रामुख्याने मराठी भाषेतूनच हवा. निवडक लघुपटांचे निर्माते, दिग्दर्शकांना आयोगाकडून प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. हे लघुपट [email protected] या इ- मेलवर १५ जून २०१९ पर्यंत पाठवावेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.