Women’s Asia Cup 2024 (IND vs NEP, Toss Update) : महिला आशिया चषक 2024 च्या गट टप्प्यातील भारताचा तिसरा सामना आज (मंगळवार,23 जुलै) नेपाळविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारताचा सलग तिसरा विजय नोंदवण्याचे लक्ष्य असेल. टीम इंडिया चार गुणांसह आणि +3.386 च्या निव्वळ रनरेटसह अ गटाच्या गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे. हरमनप्रीत कौरच्या संघाचे सहा गुण झाले की ते थेट उपांत्य फेरीत धडक मारतील.
दरम्यान, भारतीय महिला संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर या सामन्यात खेळत नाहीये. तिच्या जागी स्मृती मंधानाला कर्णधारपदाची संधी मिळाली आहे. मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, डंबुला येथे खेळला जाणार आहे.
🚨 Toss 🚨#TeamIndia win the toss and elect to bat against Nepal
Follow the match ▶️ https://t.co/PeRykFLdTV#INDvNEP | #WomensAsiaCup2024 | #ACC pic.twitter.com/zm020nlvxw
— BCCI Women (@BCCIWomen) July 23, 2024
पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 7 विकेट राखून पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात युएई (UAE) चा 78 धावांनी पराभव केला. नेपाळला पहिल्या सामन्यात एमिरेट्सचा (UAE) पराभव करण्यात यश आले होते पण दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानकडून 9 विकेटने पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताने उपांत्य फेरीत जवळपास प्रवेश निश्चित केला आहे.
नेपाळसाठी टीम इंडिया विरुद्धचा सामना अटीतटीचा असा असणार आहे. तसेच या सामन्याच्या निकालाकडे पाकिस्तानचं लक्ष असणार आहे. नेपाळने हा सामना गमावल्यास पाकिस्तान नेट रनरेटच्या जोरावर पुढील फेरीसाठी पात्र ठरेल. त्यामुळे इंडिया-नेपाळ हा सामना निर्णायक असणार आहे. नेपाळला पुढच्या फेरीत जाण्यासाठी भारताला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल, अन्यथा पाकिस्तान पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल. नेपाळने विजय मिळवल्यास पाकची वाट खडतर होणार आहे.