Women’s Asia Cup 2024 (India vs Pakistan ,Playing XI Update) : – महिला आशिया चषक 2024 स्पर्धेचा आजपासून थरार सुरू झाला आहे. आज महिला आशिया चषक 2024 चा दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या सामन्यातून दोन्ही संघ स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करतील.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल (Toss Update) हा पाकिस्तान महिला संघाच्या बाजूनं लागला आहे. पाकिस्तानची कर्णधार निदा दार हीनं नाणेफेक (Toss) जिंकून भारताविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय महिला संघाला प्रथम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावे लागणार आहे.
WOMEN’S ASIA CUP 2024.Pakistan Won the Toss & elected to bat. https://t.co/JtWHJ6yZs5 #WomensAsiaCup2024 #INDvPAK
— BCCI Women (@BCCIWomen) July 19, 2024
पाकिस्तानची कर्णधार निदा दार नाणेफेक जिंकल्यानंतर म्हणाली की, आम्ही प्रथम फलंदाजी करू. विकेट कोरडी दिसते. आम्ही कराचीमध्ये भरपूर सराव आणि प्रशिक्षण घेतले आहे. या सामन्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. टी-20 विश्वचषकापूर्वी ही उत्तम संधी आहे. आमच्याकडे गोलंदाज आणि फलंदाज यांचा चांगला मेळ आहे आणि आम्ही चांगल्या खेळाची वाट पाहत आहोत.
IND vs PAK : दोन्ही संघांची Playing 11 खालीलप्रमाणे –
भारत : स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दयालन हेमलता, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग.
पाकिस्तान : सिद्रा अमीन, गुल फिरोझा, मुनिबा अली (यष्टीरक्षक), निदा दार (कर्णधार), आलिया रियाझ, इरम जावेद, फातिमा सना, तुबा हसन, सादिया इक्बाल, नशरा संधू, सय्यदा अरुब शाह.
IND vs SL : टीम इंडियामध्ये ‘हा’ खेळाडू घेणार पांड्याची जागा? BCCIने आतापासून सुरू केली तयारी…
दरम्यान, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ गतविजेता असून आपले वर्चस्व कायम राखण्याकडे लक्ष असेल. भारताने सातवेळा आशिया कप ट्रॉफी जिंकली आहे. त्याचवेळी पाकिस्तानला एकही विजेतेपद मिळवता आले नाही. टी-20 हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर, पाकिस्तानविरुद्ध भारताचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 14 सामने खेळले गेले आहेत, ज्यात भारताने 11 जिंकले आहेत. त्याचबरोबर आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध सहापैकी पाच सामने जिंकले आहेत.