#महिला_दिन_विशेष : उपक्रमशील कार्याला सलाम…

शैक्षणिक क्षेत्रातील अध्यापनाची पदवी घेऊन प्राथमिक शिक्षिका पदावरील उत्तम पगाराची नोकरी सोडून उद्योजिका होणे पसंद करणाऱ्या आगाशिवनगर येथील राधिका मुकुंद पन्हाळे यांनी स्वतः सुरू केलेला उद्योग यशस्वीपणे सांभाळत सामाजिक कार्यात त्या सक्रियपणे कार्य सुरू ठेवले आहे.

स्वयंपाकाची मुळातच आवड असणाऱ्या राधिका यांनी त्यातूनच एखादा व्यवसाय करायचा निर्धार केला. पती मुकुंद यांची त्यांना मोलाची साथ मिळाली. आगाशिवनगर येथे त्यांनी केक व बेकरी उत्पादनाचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यात चांगला नावलौकिक मिळविला आहे. या व्यवसायाबरोबर त्या केक, बेकरी उत्पादन निर्मितीचे क्‍लासेसही घेतात. क्‍लासेसच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिला व युवतींना उद्योजिक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी बहुसंख्य तरुणांना विनामूल्य केक शॉप उभारून दिले आहेत. नोकरीच्या मागे न लागता प्रत्येकाने स्वतःचा व्यवसाय उभारून सक्षम बनावे, असा सल्ला त्या नेहमी देत असतात. याशिवाय सामाजिक कार्यातही त्या हिरीरीने सहभाग होतात.

मानव परिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक संस्था या माध्यमातून गरजू अनाथ मुलींना दत्तक घेऊन त्या मुलींचा 10 वी पर्यंतचा शैक्षणिक खर्च त्या स्वतः करीत आहेत. उपक्रमशील कार्याला महिला दिनी हार्दिक शुभेच्छा….!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.