#महिला_दिन_विशेष : सामाजिक बांधिलकी, माणुसकीचे नाते जपणाऱ्या मिनाक्षिकीताई कैलास हरगुडे

या निरपेक्ष कामामुळे रयत क्रांती शेतकरी संघटना, महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष, शिक्रापूर पोलीस स्टेशन महिला दक्षता कमिटी, सभासद, सावित्रीबाई महिला विकास मंच अशी पदे मीनाक्षीताई यांच्याकडे आहेत. समाजातील अडीअडचणीतील गोरगरीब गरजवंताला व महिला भगिनींना मीनाक्षीताई म्हटले की, आठवते निस्वार्थपणे समाजाची व समाजातील गरजूंची निरपेक्ष सेवा करणारी भगिनी, गरिबांना व गरजूंना हक्काचा उंबरठा म्हणजे मीनाक्षाताईंचे घर. मीनाक्षीताई या सर्वांना काहीनाकाही मदत करतात.

त्याच्या अडीअडचणी समजून घेणार त्याला आधार देणारं, चुकत असेल समजून सांगणार आणि त्याच्या अडचणीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार. समाजातील तळागाळातील लोकांसाठी झटणाऱ्या व त्यासाठी सामाजिक बांधिलकी व माणुसकीचे नाते जपत सर्वांना हसत मुखाने मदत करणारा निरपेक्ष हात म्हणजे मीनाक्षीताई हरगुडे…

लॉकडाऊन काळात गरीब लोकांचे हाल होऊ लागले. अशा कठीण काळात मीनाक्षीताई गरीब मजूर, हातावर पोट असणाऱ्यांसाठी एक आई, मोठी ताई म्हणून धावून आल्या व धान्याच्या किटचे वाटप केले. अनेकांना दोन वेळचे जेवण मिळवून दिले.

करोनाचा नुकताच प्रादुर्भाव सुरू झाला होता, जिकडे तिकडे लोक भयभीत होते. त्याकाळात शिक्रापूर येथे एक महिला रस्त्याने फिरत होती चारपाच दिवस ती उपाशीपोटी रस्त्यावर फिरत होती. ती वेडसर महिला होती. करोनासारख्या काळात रक्ताच्या नात्याला घरात बोलवताना लोक खूप विचार करत होते. त्यावेळेस मीनाक्षीताई हरगुडे यांनी त्या वेड्या महिलेस घरी आणले, तिला मुलीसारखं जपले. ज्यावेळेस त्या वेडसर महिलेस आश्रमात सोडण्यासाठी गेल्या तेव्हा कोणाला विश्‍वास बसत नव्हता की, ही वेडसर महिला आहे, इतका तिच्यात बदल त्यांनी घडवला.

ती वेडसर महिला आश्रमात सोडण्यासाठी गेलेल्या मीनाक्षीताईंच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडली. कदाचित तिला ज्या प्रेमाची, आपुलकीची मायेच्या उबेची आवश्‍यकता होती. ते तिला मीनाक्षी ताईंच्या घरी मिळाली. तिच्या दुःखावर मायेची फुंकर मीनाक्षीताईंनी घातली म्हणून तिचे हृदय भरून आले आणि मायेने व आपुलकीने तिने कृतज्ञपणे मीनाक्षी ताईंना मिठी मारत आपल्या आयुष्यातील दुःखाला वाट मोकळी करून दिली.

मीनाक्षी ताईंना पदाची, मानमरातब यांची अपेक्षा नाही त्यांच्यासाठी गरिबांची सेवा, त्यांच्या अडीअडचणीच्या काळात त्यांच्या उपयोगी पडणे हीच खरी ईश्‍वर भक्ती आहे. पण त्यांना सामाजिक कार्यात व समाजसेवेत धन्यता वाटते आज गोरगरीब महिलेचा आवाज म्हणजे मीनाक्षीताई हरगुडे आहेत. अडचणीच्या काळात विश्‍वासाने मदतीला धावून येत दुःखातून बाहेर काढणारा मोठ्या बहिणीचा हात म्हणजे मीनाक्षीताई हरगुडे. आज त्या पीडित, असंघटित महिलांचा बुलंद, निर्भिड आवाज बनल्या आहेत, अन्यायाविरुद्ध आवाज व त्यामागील ताकद म्हणजे मीनाक्षीताई हरगुडे या होत. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ताईंनी आत्तापर्यंत प्रचंड सामाजिक करू केले आहे.

मीनाक्षीताईंनी समाजातील अडीअडचणीतील गोरगरीब गरजवंताला व महिला भगिनींना मीनाक्षी ताई म्हटले की, आठवते निस्वार्थपणे समाजाची व समाजातील गरजूंची निरपेक्ष सेवा करणारी भगिनी, गरिबांना व गरजूंना हक्काचा उंबरा म्हणजे मिनक्षिताई तळागाळातील लोकांसाठी झटणाऱ्या व त्यासाठी सामाजिक बांधिलकी व माणुसकीचे नाते जपत सर्वांना हसत मुखाने मदत करणारा निरपेक्ष हात म्हणजे मीनाक्षीताई हरगुडे.

शब्दांकन ः उदयकुमार ब्राह्मणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.