#महिला_दिन_विशेष : कार्यकर्तृत्वातून उमठवला कामाचा ठसा

गेली चार वर्षापासून कराड शहरासह आपल्या प्रभागातील विकास कामांमुळे नगरसेविका सुप्रिया तुषार खराडे यांनी कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. 2015 साली पालिकेत सदस्य म्हणून दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडे नियोजन व विकास समितीचे सभापती पद आले. या काळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवतला. सुमंगलनगर, रेव्हीन्यु क्‍लब व शाहू चौक येथे मिनी हायमस्ट उभारले.

कार्वेनाका येथे दहा एलईडी बसवून परिसर प्रकाशमय केला. शहरातील वाढीव भागातील सुमारे दोनशे धोकादायक पोल बदलून सुमारे दीडशे नवीन पोल उभे करून स्ट्रीट लाईटची सोय केली. शहरातील मुख्य चौक व ठिकाणांवर सीसीटीव्ही बसवले. प्रभाग क्रमांक 14 मध्ये चार वर्षात बावीस रस्त्यांसाठी तब्बल चार कोटी रुपयांचा निधी आणला आहे. त्याबरोबर झोपडपट्टीवासीयांच्या ज्वलंत प्रश्नला हात घातला.

कार्वे नाका येथे सार्वजनिक शौचालय व ड्रेनेज योजना पूर्णत्वास नेऊन त्या कार्यान्वित करण्यात आल्या. प्रभागातील राहिलेल्या सर्व गल्लीबोळात पाण्याची लाईन टाकण्यात आली. करोना काळात सामाजिक बांधिलकी जपली.

एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक 14 चा झपाट्याने विकास होत आहे. याकामी त्यांचे पती तुषार खराडे व दीर राहुल खराडे तसेच नागरिकांच्या सहकार्याने या प्रभागात विकास कामे आणता आल्याचे नगरसेविका सुप्रिया खराडे या आवर्जून सांगतात. अशा विकासभिमुख नगरसेविकेच्या कार्यकर्तृत्वाला महिला दिनी सलाम…!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.