महिलांनी सुुरू केले निर्मिती कांस्यथाळी यंत्र सेंटर

बाणेर येथे बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन निर्मिती ग्रुपची स्थापना केली आहे. या निर्मिती ग्रुपतर्फे बाणेर येथे निर्मिती कांस्यथाळी यंत्र सेंटर चालू करण्यात आले आहे. पूर्वी उष्णता दूर करणे तसेच थकवा घालविण्यासाठी कांस्य वाटी वापरली जात असे. आयुर्वेदामध्ये कांस्य वाटीचे मोठे महत्त्व आहे. पण हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाही दुसऱ्या व्यक्तीसाठी वेळ नाही, अशावेळी आयुर्वेदाला तंत्रज्ञानाची साथ देऊन दुसऱ्या व्यक्तीची मदत न घेता कांस्यथाळी यंत्रावर मसाज केली जात आहे. यात तेल व तुपाने मसाज केले जाते बाणेर येथे या सेंटरला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

कांस्यथाळी यंत्र मसाजचे फायदे
गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी अशा त्रासांचे प्रमाण कमी करण्यासाठी, शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी करण्यासाठी, शरीरातील वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी, डोळ्यांच्या स्नायूंना चालना मिळण्यासाठी, शरीरातील थकवा कमी होऊन थंडावा वाढण्यासाठी, शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठी, मधुमेहामुळे पायाच्या संवेदना कमी होऊ नये म्हणून उपयोगी, पायावरची सूज कमी करण्यासाठी, तळव्याला भेगा पडणे तसेच पायाची जळजळ होणे अशा समस्या कमी करण्यासाठी, शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी, व्हेरीकोज व्हेन्सवर उपायुक्त, डोळ्याखालील काळेपणा कमी करण्यासाठी व निद्रानाशाची समस्या आटोक्‍यात राहण्यासाठी. निर्मिती ग्रुपतर्फे बाणेर येथे कास्य थाळी सेंटर बरोबरच महिलांसाठी विविध प्रकारचे हॉबी क्‍लासेस देखील चालविले जातात तसेच विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्स व इवेंट मॅनेजमेंट व ब्यूटी सर्व्हिसेस देखील पुरवले जाता

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)