‘आता महिलांनीही जेम्स बॉण्डचे रोल करावेत’

जेम्स बॉण्ड म्हटले की एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हाताने मादक ललनेला जवळ धरणारा बॉण्ड आपल्याला आठवतो. आतापर्यंत किमान दिड डझनभर बॉण्डपटांमधून अर्धा डझनपेक्षा अधिक कलाकारांनी जेम्स बॉण्डचा रोल साकारला आहे. मात्र त्या सगळ्यांमध्ये पिअर्स ब्रॉस्ननने साकारलेला जेम्स बॉण्ड सर्वाधिक लक्षात राहतो.

जेम्स बॉण्ड हे पात्र पुरुष कलाकाराने साकारण्याची प्रथा हॉलिवूडमध्ये जरी प्रस्थापित झाली असली, तरी आता बॉण्डचा रोल एखाद्या महिलेने साकारावा अशी इच्छा पिअर्स ब्रॉस्ननने अलीकडेच व्यक्त केली. पुरुष कलाकारांनी गेल्यात 40 वर्षांमध्ये ऍक्‍शन हिरोचे रोल साकारले आहेत. ऍक्‍शन रोल करणाऱ्या अभिनेत्री फारच थोड्या आणि अपवादात्मक आहेत. आता महिलांनीही हे रोल सर्रासपणे साकारायला हवे. मात्र हॉलिवूडमध्ये हा बदल सहजपणे स्विकारला जाणार नाही, हेदेखील आपल्याला माहित असल्याचे पीअर्स ब्रॉस्ननने सांगितले.

पुढचा बॉण्डपट डॅनियल क्रेग साकारणार आहे, मात्र त्यापुढील “नो टाईम टू डाय’ या बॉण्डपटामध्ये डॅनियल क्रेगच्या ऐवजी लताशा लिंच ही लेडी बॉण्ड साकारणार असल्याची चर्चा आहे. जर तसे झाले तर पीअर्स म्हणतो, त्याप्रमाणे लेडी बॉण्ड हॉलिवूडमध्ये दिसू शकेल.

यापूर्वी रॉजर मूर, शॉन कॉनेरी, पीअर्स ब्रॉस्नन, डिमोथी डाल्टन, जॉर्डन लेजेनबे आणि डॅनियल क्रेग यांनी जेम्स बॉण्डची भूमिका साकारली आहे. 2006 पासून डॅनियल क्रेग याने सलग पाच बॉण्डपटामध्ये जेम्स बॉण्ड साकारला आहे. मात्र आता आपण जेम्स बॉण्ड साकारणार नाही, असे त्याने 2015 मध्ये “स्पेक्‍टर द 007′ च्या शूटिंगच्या वेळी स्पष्ट केले होते. तेव्हापासूनच नवीन बॉण्ड शोधला जाण्याची चर्चा सुरू झाली. मात्र तरीही “बॉण्ड 25’मध्ये डॅनियल क्रेग असणार आहे. त्यानंतर नवीन बॉण्ड दिसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)