महिलांनी व्यवसायात सक्रिय व्हावे -वळसे पाटील

अनुसया नागरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

मंचर-महिलाच्या विकासांसाठी अनुसया उन्नती केंद्राची स्थापना केली आहे. केंद्रामध्ये महिलांच्या छोट्या मोठ्या व्यवसायांसाठी आर्थिक गरजपूर्ती करण्यात आली. त्यामुळे महिलांना स्वावलंबी होण्यासाठी मदत झाली. महिलांनी व्यवसायात जास्तीत जास्त सक्रिय होऊन आपल्या कुटुंबासह गावाचा उत्कर्ष करावा, असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले.

मंचर येथील अनुसया नागरी सहकारी पतसंस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यावेळी वळसे पाटील बोलत होते. ते म्हणाले मंचर येथील अनुसया महिला उन्नती केंद्रामुळे महिलांना रोजगाराची दिशा मिळाली आहे. अनुसया पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू महिलांना आर्थिक मदत झाली आहे. महिलांनी स्वावलंबी होवुन व्यवसाय वृद्धी करावी. संस्थेने या आर्थिक वर्षात 5 कोटी ठेवीचा आणि 4 कोटी कर्ज वाटपाचा टप्पा पार करून ऑडिट वर्ग अ मिळविला आहे.

यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा किरणताई वळसे पाटील, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, राजमाला बुट्टे पाटील, पुर्वा वळसे पाटील, आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषाताई कानडे, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, सुनिता पाटील, सुषमा शिंदे, यांच्यासह संचालक मंडळ, कायदेशीर सल्लागार आणि लेखापरिक्षक उपस्थित होते. अहवालवाचन व्यवस्थापिका गायत्री वाळेकर यांनी केले. सूत्रसंचालन दीपाली लोखंडे यांनी तर ज्योती घोडेकर यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here