नगर – निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक क्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघ प्रत्येकी एक एक याप्रमाणे सखी मतदान केंद्र करण्यात आले होते या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिलांवर देण्यात आली ती त्यांनी फनी पार पडली.
त्यामुळे विधानसभा निवडणूक राज्यात 352 सचिन मतदान केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यात जिल्ह्यातील बारा मतदारसंघात 16 सखी मतदार केंद्राची निर्मिती करण्यात आली असून याठिकाणी सर्व कर्मचारी महिला असणार आहे सर्वाधिक 4 सखी मतदान केंद्र नगर शहर मतदार संघात असून कर्जत जामखेड मतदार संघात दोन सखी मतदान केंद्र रस्त्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली आहे.
या सखी मतदान केंद्रांमध्ये पोलीस कर्मचारी पोलिसांपासून निवडणूक कामासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी सर्व महिलाच असणार आहे मतदान प्रक्रियेमध्ये महिलांचा अधिकाधिक सकारात्मक सहभाग वाढावा त्यासाठी सखी मतदान केंद्रांची उभारणी केली आहे येथील सर्व कामे महिलांकडून नियंत्रित करण्यात येणार असो या मतदान केंद्रामध्ये कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहे.