महिलांनो हार्ट ॲटॅकची लक्षणे ओळखा!

आज जगभरात हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढत आहे. लोकांचा असा विश्‍वास आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयविकाराच्या झटक्‍याचा धोका कमी असतो. परंतु हा समज अगदी चुकीचा आहे. या व्यतिरिक्‍त, पुष्कळ लोक असेही मानतात की, 40 व्या वयाच्या नंतर पुरुषांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि 45 वर्षांनंतर स्त्रियांना. मात्र हृदयविकाराचा झटका कोणत्याही वेळी आणि कोणत्याही वयात आणि कोणालाही येऊ शकतो, मग कोणी 25 वर्षांचे असो वा 50 चे.

खूप विश्रांती घेतल्यानंतरही जर तुम्हाला सतत थकल्यासारखे वाटत असेल आणि आपण उठू आणि 10 पायऱ्याही चालू शकणार नाही, असे वाटत असेल तर ते हृदयविकाराच्या झटक्‍याचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही सावध राहावे आणि त्वरित डॉक्‍टरांना भेटावे. छातीत दुखणे हे हृदयविकाराचा एक प्रमुख लक्षण आहे, परंतु अमेरिकेच्या क्‍लेव्हलॅंड क्‍लिनिक मेडिकल सेंटरने नुकत्याच केलेल्या संशोधन अहवालानुसार हृदयविकाराच्या झटक्‍याची अशी अनेक लक्षणे आहेत जी केवळ महिलांमध्येच दिसून येतात.

चला जाणून घेऊया ती लक्षणे कोणती आहेत ते…

जेव्हा छातीत दुखणे सहसा हृदयविकाराच्या झटक्‍याशी संबंधित असते तेव्हा क्‍लीव्हलॅंड क्‍लिनिक मेडिकल सेंटर असा दावा करतो की हृदयविकाराचा झटका आल्यास महिलांना मान, जबडा, पाठ, हात असे दुखणेदेखील होऊ शकते. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

श्‍वासोच्छ्वासाच्या समस्या हृदयविकाराचे एक सामान्य लक्षण आहे; परंतु अलीकडील एका संशोधन अहवालात असे म्हटले आहे की, महिलांमध्ये चक्कर येणेदेखील हृदयविकाराच्या झटक्‍याचे लक्षण असू शकते. म्हणून फार सतर्क राहण्याची गरज आहे.

ओटीपोटात दुखणे सहसा प्रत्येकासाठी एक समस्या असते, परंतु स्त्रियांमध्ये, जर ओटीपोटात तीव्र वेदना किंवा असामान्य दबाव असेल तर ते हृदयविकाराचा झटका येण्याचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत आपण हृदयरोगाशी संबंधित डॉक्‍टरांशीही संपर्क साधावा.

शरीरातून घाम येणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. परंतु हृदयविकाराच्या झटक्‍यातही स्त्रियांना थंड घाम येणे हे बऱ्याच वेळा पाहिले गेले आहे. आपल्यालाही अशीच समस्या असल्यास आपण तत्काळ डॉक्‍टरांशी संपर्क साधावा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.