महिलांकडून तिरथ सिंह रावतांच्या वक्तव्याचा निषेध; पोस्ट केले फोटो

नवी दिल्ली : उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचीच चर्चा सध्या देशभर होत आहे. फाटकी जीन्स घालणाऱ्या महिला आपल्या मुलांवर काय संस्कार देणार?, असे वादग्रस्त वक्तव्य रावत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरांतून टीका झाली. दरम्यान, त्यांच्यावर टीका झाल्यानंतरही रावत यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे.

तीरथ सिंह रावत यांनी वादग्रस्त विधानावर बोलताना,“आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही, पण फाटक्या जीन वापरण्याला विरोधच आहे,” असे रावत यांनी म्हटले आहे. तीरथ सिंह रावत यांनी बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना वक्तव्य केलं होतं. ज्याचे देशभरात पडसाद उमटले.

राजकीय पक्षांपासून ते सोशल मीडिया युजर्सपर्यंत सर्व स्तरावर तीरथ सिंह रावत यांच्यावर टीका केली जात आहे. अभिनेत्री भूमिका हिनेही फाटलेल्या जीन्ससोबतचा आपला फोटो ट्विटरवर शेअर केला आहेत.


तसेच, लिहिले आहे की, “फाटलेली जीन्स फाटलेल्या मेंदूपेक्षा चांगली आहे.”या व्यतिरिक्त बऱ्याच महिला #RippedJeansTwitter या हॅशटॅगला समर्थन देत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत आहेत.

दुसरीकडे, राज्यसभा खासदार जया बच्चन, टीएमसीचे खासदार महुआ मोईत्रा यांनीही तिरथसिंग रावत यांच्या विधानाचा निषेध केला आहे. “अरे देवा, त्यांचे गुडघे दिसत आहेत,” अशा कॅप्शनसहीत प्रियंका यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या फोटोंचं कोलाज आहे. या फोटोंमध्ये हे सर्व वरिष्ठ नेते संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले दिसत असून त्यांनी संघाचा पोशाख म्हणजेच अर्ध्या बाह्यांचा पांढरा शर्ट आणि हाफ पॅण्ट घातलेली दिसत आहे. रावत यांनी गुडघे दिसणाऱ्या महिलांसंदर्भात वक्तव्य केल्याने त्याचा आधार घेत प्रियंका यांनी या वरिष्ठ नेत्यांचेही गुडघे दिसत होते असा टोला लगावला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.