पुणे – फायर डक्टमध्ये पडून एका मजूर महिलेचा मृत्यू झाला. ही घटना वाघोली येथील डिफेन्स कॉलनी फेज 4 मध्ये घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात संबंधीत बांधकाम व्यवसायीकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी नारायण माहुरे(30,रा.वाघोली) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, डिफेन्स कॉलनीमध्ये टेरेसवर बांधकाम मजूरांकडून काम करु घेणे सुरु होते. कामगारांच्या सुरक्षेच्या दुष्टीकोनातून त्यांना हेल्मेट , जाळी, बेल्ट आदी कोणतीही साधन सामग्री पुरवण्यात आली नाही. तोल गेल्याने लक्ष्मी या फायर डक्टच्या मोकळ्या जागेतून खाली पडून मृत्यू पावल्या. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोरे करत आहेत.