मधमाशांच्या हल्ल्यात प्राध्यापकांसह महिला जखमी

तळमावले- येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या छताला बसलेल्या मधमाशांच्या पोळ्यातील माशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात चार प्राध्यापक व एक महिला जखमी झाल्याची घटना घडली. महाविद्यालयात एफ.वाय. बी.कॉम.चे वर्ग सुरू असताना अचानक मधमाशांनी धुमाकूळ घालत महाविद्यालयात प्रवेश केला. यावेळी चार प्राध्यापक व इमारती शेजारून जाणारी महिला यांच्यावर मधमाशांनी हल्ला करीत त्यांना जखमी केले. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांचीच पळापळ झाली.

महिलेवर हल्ला होत असताना ग्रंथालय परिचर राजू दोडमणी यांनी स्वत:चा जीव धोक्‍यात घालून महिलेस सुरक्षित ठिकाणी नेले. मधमाशांच्या या पोळ्यामुळे महाविद्यालयात भीतीचे वातावरण तयार झाले होते. परंतु सदरचे मधाचे पोळे जाळून काढण्यात आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.