८७ टक्‍के महिलांमध्‍ये जीवनसत्त्व ड ची कमतरता

७२ टक्‍के महिला हाडांच्‍या आजारांनी त्रस्‍त

  • कांचन नायकवडी

महिलांना हृदयसंबंधित आजार होण्‍याचे प्रमाण जवळपास २९ टक्‍के आहे, ७२ टक्‍के महिला हाडांच्‍या आजारांनी त्रस्‍त आहेत, तर ८७ टक्‍के महिलांमध्‍ये जीवनसत्त्व ड ची कमतरता आहे

जनुके, शरीररचना व हार्मोन पातळ्यांमधील फरकामुळे काही आजार पुरूषांपेक्षा महिलांना अधिक होतात. पुरूष व महिला या दोघांनाही विविध आजार होतात, पण काही आरोग्‍यविषयक आजारांचा महिलांवर विभिन्‍नरित्‍या व अधिक प्रमाणात परिणाम होतो. तसेच अनेक महिलांचे आरोग्‍यविषयक आजारासंदर्भात निदान होत नाही. महिलांना अनेक आरोग्‍यविषयक आजारांचा सामना करावा लागतो, जसे स्‍तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, रजोनिवृत्ती आणि प्रसूतीकाळ. पुरूषांच्‍या तुलनेत महिलांचे हृदयाघातामुळे अधिक मृत्‍यू होतात. महिला रूग्‍णांमध्‍ये वारंवार नैराश्‍य व चिंता दिसून येते. यूरिनरी ट्रॅक्‍ट आजार अधिककरून महिलांमध्‍ये दिसून येतात आणि लैंगिक संक्रमिक आजारांचा महिलांना अधिक त्रास होऊ शकतो.

जवळपास १०,००० व्‍यक्‍तींची तपासणी करण्‍यात आली, ज्‍यापैकी ४०९३ महिला होत्‍या. या तपासणीच्‍या डेटामधून निदर्शनास आले की, १७ टक्‍के महिला थायरॉईड आजाराने पीडित आहे, तर पुरूषांमध्‍ये हे प्रमाण ९ टक्‍के आहे. १६ टक्‍के महिलांना यूरिन संसर्गाचा त्रास आहे, तर पुरूषांमध्‍ये हे प्रमाण ६ टक्‍के आहे. ६ टक्‍के पुरूषांच्‍या तुलनेत ३२ टक्‍के महिलांना अॅनेमिया आहे. ७२ टक्‍के महिला हाडांच्‍या आजारांपासून पीडित होत्‍या, तर ८७ टक्‍के महिलांमध्‍ये जीवनसत्त्व ड कमतरता होती.

२७ टक्‍के महिलांच्‍या पॅप स्‍मीअर रिपोर्टमध्‍ये काही अॅब्‍नॉर्मलिटी असल्‍याचे आढळून आले. पॅप स्‍मीअर ही गर्भाशयाचा कर्करोगाचे निदान करण्‍यासाठी केली जाणारी मूलभूत स्क्रिनिंग चाचणी आहे. या अॅब्‍नॉर्मलिटीजमध्‍ये सौम्‍य वेदनांपासून कर्करोग पेशींच्‍या उपस्थितीपर्यंतचा समावेश होता. २० टक्‍के महिलांच्‍या सोनोमॅमोग्राफी रिपोर्ट्समधून आजारांची निष्‍पत्ती झाली. महिलांमध्‍ये हृदयविषयक आजारांचे प्रमाण जवळपास २९ टक्‍के होते आणि अब्‍नॉर्मल फास्टिंग शुगर पातळ्यांचा जवळपास ४० टक्‍के महिलांमध्‍ये परिणाम दिसून आला.

या आजारांसाठी धोकादायक घटकांबाबत जाणून घेत नियंत्रण ठेवा. त्‍यानंतर हा धोका कमी करण्‍याकडे लक्ष द्या. गंभीर आजारांचे व्‍यवस्‍थापन करा आणि शिफारसीनुसार नियमितपणे तपासणी करा. नियमित तपासणी करण्‍याची सवय अंगिकारा. हृदयविषयक आजार व स्‍ट्रोकचा धोका वाढवणारे उच्‍च कोलेस्‍ट्रॉल, उच्‍च रक्‍तदाब किंवा मधुमेह सारख्‍या आरोग्‍यविषयक आजारांसह निदान झाले असेल तर डॉक्‍टरांनी दिलेल्‍या सल्‍ल्‍यानुसार औषधोपचाराचे काटेकोरपणे पालन करा. तसेच मॅमोग्राम्‍स (सामान्‍यत: ४० वर्षे आणि त्‍यापेक्षा अधिक वयानंतर) आणि इतर कर्करोगसंदर्भात तपासणी केव्‍हा करावी यासंदर्भात डॉक्‍टरांशी सल्‍लामसलत करा.

आरोग्‍यदायी जीवनशैली अंगिकारा. कौटुंबिक इतिहासासारखे धोकादायक घटक तुम्‍ही टाळू शकत नाहीत, पण तुम्‍ही हृदयविषयक आजार, स्‍ट्रोक, कर्करोगासाठी इतर धोकादायक घटकांवर नियंत्रण ठेवू शकता. उदाहरणार्थ: धूम्रपान करू नका. तुम्‍ही धूम्रपान करत असाल किंवा इतर तंबाखूजन्‍य उत्‍पादनांचा वापर करत असाल, तर हे व्‍यसन सोडण्‍यास मदत करण्‍यासाठी डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या.

आरोग्‍यदायी आहार सेवन करा. पालेभाज्‍या, फळे, कडधान्‍ये, उच्‍च फायबर फूड्स आणि मासे यांसारख्‍या प्रथिनांनी युक्‍त स्रोतांची निवड करा. संतृप्‍त व ट्रान्‍स फॅट्सने युक्त खाद्यपदार्थ, तसेच अतिरिक्‍त शर्करा असलेल्‍या खाद्यपदार्थांचे सेवन मर्यादित करा.
आरोग्‍यदायी वजन राखा. अतिरिक्‍त वजन कमी केल्‍याने आणि वजनावर नियंत्रण ठेवल्‍याने हृदयविषयक आजार, तसेच इतर अनेक आजारांचा धोका कमी करण्‍यामध्‍ये मदत होऊ शकते.

व्‍यायाम करा. व्‍यायामामुळे वजनावर नियंत्रण ठेवण्‍यामध्‍ये आणि हृदयविषयक आजार व स्‍ट्रोकचा धोका कमी करण्‍यामध्‍ये मदत होऊ शकते. तसेच यामुळे विशिष्‍ट प्रकारच्‍या कर्करोगांचा धोका कमी करण्‍यामध्‍ये देखील मदत होऊ शकते. तुम्‍हाला आवडणा-या व्‍यायाम प्रकारांची निवड करा जसे जलदपणे चालणे, बॉलरूम डान्सिंग. सर्व प्रकारचे व्‍यायाम आजारांचा धोका कमी करू शकतात.

मद्यपान टाळा. अतिप्रमाणात मद्यपान केल्‍याने रक्‍तदाब वाढू शकतो आणि यकृताचे आजार होण्‍याचा धोका देखील वाढू शकतो.
तणाव कमी करा. तुम्‍हाला सतत तणाव जाणवत असेल किंवा तुम्‍ही सतत कोणत्‍या-ना-कोणत्‍या दबावाखाली असाल तर त्‍याचा जीवनशैली सवयींवर परिणाम होऊ शकतो आणि परिणामत: रोगप्रतिकारशक्‍तीवर परिणाम होऊ शकतो. म्‍हणून तणाव कमी करण्‍याचे उपाय शोधा किंवा तणावाचा योग्यरित्या सामना करण्‍यास शिका.

अनुवांशिक पूर्वस्थिती / प्रवृत्तींची माहिती ठेवा: आरोग्‍यविषयक आजारांसंदर्भात अनुवांशिक पूर्वस्थिती / प्रवृत्तींची माहिती घ्‍या आणि पोषण/आहार व फिटनेस प्‍लानचे नियोजन करा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.